Author: Sharad Bhalerao

साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.एन.आर.जी. इंग्लिश मीडियम स्कूल, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वॉटर प्युरिफायर (R.O.) सिस्टीमचे संस्थेस जना स्मॉल फायनान्स बँकेकडून हस्तांतरण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समता फाउंडेशन रिसोड, जि. वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डाचे वाटपासह नोंदणी, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम नुकतेच झाले. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. यावेळी बँकेचे विभागीय प्रमुख प्रशांत गोरकल, क्षेत्र प्रमुख ज्ञानेश्वर पाटकर, समता फाउंडेशन रिसोड, जि. वाशिमचे पदाधिकारी अतुल महाजन, ॲड. घनश्याम पाटील, भुपेंद्रभाई गुजराथी, डी.पी साळुंखे, डॉ.…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील गोंडखेल येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेतील पालक सभेत शालेय व्यवस्थापन समितीची नुकतीच निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी पराडे होते. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आरती विठ्ठल कोळी यांची तर उपाध्यक्षपदी शिला अनिल राजपूत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड मुख्याध्यापक तथा सचिव संजीव ठाकरे यांनी जाहीर केली. कार्यकारिणीत सदस्यांमध्ये वैशाली बनकर, अजय सपकाळे, सुरेखा चोपडे, संतोष पराडे, अश्विनी कोळी, सुमन गायकवाड, प्रवीण कोळी, शरद कोळी, नयना कोळी, रणजीत कोळी, किर्ती बहाकर, अशोक कोळी यांची निवड झाली. यशस्वीतेसाठी शिक्षक राजाराम कोळी, आकोश कोळी, नामदेव पाटोळे, प्रमोद पाटील यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी जि.प.वावडे शाळेच्या उपक्रमशिल शिक्षिका तथा कवयित्री सुनिता रत्नाकर पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची आणि विद्यार्थी हिताचे गुणवत्तापूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांना जामनेर जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार’ मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते जामनेर येथे नुकताच प्रदान करण्यात आला. सुनिता पाटील ह्या नियमितपणे आपल्या कौशल्याने विद्यार्थी गुणवत्ता कशी वाढेल, यासाठी विविध उपक्रम राबवून गेल्या वीस वर्षापासून आपली शैक्षणिक सेवा बजावत आहेत. यापूर्वी त्यांनी ढेकू तांडा येथील शाळेवर असतांना हंगामी स्थलांतरीत होणाऱ्या मुलांसाठी केलेल्या कार्यासाठी बालरक्षक प्रतिष्ठानकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक नव्हे तर साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयात आजी-आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करत आजी-आजोबा दिन साजरा झाला. यावेळी उपस्थित आजी-आजोबांसाठी संगीत खुर्ची, गायन स्पर्धाही घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंजूषा नानकर होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ उपशिक्षक जिजाबराव वाघ उपस्थित होते. संगीत खुर्ची स्पर्धेत २०हून अधिक आजी सहभागी झाल्या होत्या. त्यात रत्नाबाई साहेबराव चौधरी तर गायन स्पर्धेत मंगलाबाई अरुण कोळी या आजींनी बाजी मारली. त्यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. फुलांच्या पाकळ्या अंथरुण स्वागत सोहळ्यासाठी उपस्थित आजी-आजोबांचे फुलांच्या पाकळ्या अंथरुण स्वागत करण्यात आले. नातवंडांनी खास आपल्या हातांनी तयार करुन आणलेली भेटकार्डे आजी-आजोबांना दिली. आपल्या नातवंडांचे निरागस प्रेम पाहतांना त्यांच्या…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी समाजसेवेची आवड असणारे आणि अन्यायाविरुद्ध लढा देणारे व्यक्तीमत्त्व अशी ओळख असणारे भोजराज आमले यांची मानव अधिकार संरक्षण समितीच्या चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. मानव अधिकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांनी चाळीसगाव तालुक्याची जबाबदारी आमले यांच्याकडे सोपविली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, सर्व सामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न तसेच निस्वार्थी सेवा अशी कारकीर्द असलेल्या भोजराज आमले यांना भोकरदन, जि.जालना येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन समाजसेवेची संधी दिली आहे.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तरवाडे पेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भोंगळ कारभार सुरु होता. तसेच एकाचवेळी सर्व स्टाफ गैरहजर राहत होता. त्यामुळे याबाबत आरोग्य केंद्राची चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आदेश नाशिक आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालकांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश रामदास निकम यांनी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीची उपसंचालकांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. सविस्तर असे की, तत्कालीन तथा प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी देवराम किसन लांडे यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी जाऊन धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने ५० हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. हेच लांडे…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी ते सावदा रस्त्यावरील शेतातील मंदिराजवळ शनिवारी, ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता चारचाकी वाहन घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना परप्रांतीय पाच दरोडेखोरांना अटक करण्यात धरणगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी ते सावदा गावादरम्यान असलेल्या शिवारातील सप्तश्रृंगी मातेच्या मंदिराजवळ चारचाकी वाहन घेवून काहीजण दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी, ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता पोलिसांनी सापळा रचून परप्रांतीय पाच दरोडेखोरांना शिताफीने…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला सायकलवर बसवून टेकडीवर नेत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती अमळनेर येथील शाळेत शिक्षण घेत असल्याने तिच्या गावापासून ते अमळनेर शहरापर्यंत बसने प्रवास करत असते. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता पीडित मुलगी ही अमळनेर बसस्थानकात बसची वाट बघत असतांना तिच्या ओळखीचे साहिल आणि भुऱ्या या दोन जणांनी तिला सायकलवर बसवून पिरबाबा टेकडीजवळ घेवून गेले. त्याठिकाणी एकांतात तिच्याशी अंगलट करून तिचा विनयभंग केला. दरम्यान हा…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाघारी गावात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांसह पती आणि सासरच्या मंडळींविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जामनेर तालुक्यात वाघारी येथे अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. मुलगी ही अल्पवयीन असतांनाही तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न २०२२ मध्ये त्यांच्या नात्यातील २२ वर्षीय तरूणासोबत लग्न लावून दिले. त्यानंतर पीडित मुलगी ही अल्पवयीन असतांना तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलगी व तिचे पती हे पुण्यातील कात्रज येथे राहण्यासाठी गेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. गर्भवती असल्याने तिला पुण्यातील भारती हॉस्पिटल येथे…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी शिवसेनेच्या ठाकरे गटाची (उबाठा) रविवारी, १० सप्टेंबर रोजी जळगावात वचनपूर्ती सभा झाली. सभेला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानव्ो उपस्थित होते. सभेला संबोधित करताना खा.संजय राऊत यांंनी जळगावातील बंडखोर शिवसेना आमदारांसह (शिंदे गट) भारतीय जनता पार्टीवर टीकास्त्र सोडले. याव्ोळी संजय राऊत म्हणाले की, लोक म्हणत होते जळगावातली शिवसेना संपली. परंतु ते चार टकले म्हणजे शिवसेना आहे का? असा प्रश्नही त्यांनी भर सभेत उपस्थित केला. खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, अनेकांना आजच्या सभेची चिंता वाटत होती. सभेला गर्दी होईल की नाही याची काहींना काळजी वाटत होती. कारण काही…

Read More