जामनेरला जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे ‘आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार’

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

जि.प.वावडे शाळेच्या उपक्रमशिल शिक्षिका तथा कवयित्री सुनिता रत्नाकर पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची आणि विद्यार्थी हिताचे गुणवत्तापूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांना जामनेर जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार’ मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते जामनेर येथे नुकताच प्रदान करण्यात आला.

सुनिता पाटील ह्या नियमितपणे आपल्या कौशल्याने विद्यार्थी गुणवत्ता कशी वाढेल, यासाठी विविध उपक्रम राबवून गेल्या वीस वर्षापासून आपली शैक्षणिक सेवा बजावत आहेत. यापूर्वी त्यांनी ढेकू तांडा येथील शाळेवर असतांना हंगामी स्थलांतरीत होणाऱ्या मुलांसाठी केलेल्या कार्यासाठी बालरक्षक प्रतिष्ठानकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक नव्हे तर साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्या सध्या खान्देश साहित्य संघ, शाखा अमळनेर येथील तालुकाध्यक्ष म्हणून काम उत्कृष्टपणे करत आहेत. ह्या पुरस्कारामुळे त्यांचे वावडे येथील सर्व ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक वृंद तसेच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here