चार ‘टकल्यांच्या’ मनात भरली धडकी

0
1

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

शिवसेनेच्या ठाकरे गटाची (उबाठा) रविवारी, १० सप्टेंबर रोजी जळगावात वचनपूर्ती सभा झाली. सभेला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानव्ो उपस्थित होते. सभेला संबोधित करताना खा.संजय राऊत यांंनी जळगावातील बंडखोर शिवसेना आमदारांसह (शिंदे गट) भारतीय जनता पार्टीवर टीकास्त्र सोडले. याव्ोळी संजय राऊत म्हणाले की, लोक म्हणत होते जळगावातली शिवसेना संपली. परंतु ते चार टकले म्हणजे शिवसेना आहे का? असा प्रश्नही त्यांनी भर सभेत उपस्थित केला.

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, अनेकांना आजच्या सभेची चिंता वाटत होती. सभेला गर्दी होईल की नाही याची काहींना काळजी वाटत होती. कारण काही लोक सारखं, सारखं म्हणायचे की, जळगावची शिवसेना गेली, जळगावातली शिवसेना संपली, अरे चार टकले गेले म्हणून शिवसेना संपली का? ते चार टकले म्हणजे शिवसेना आहे का? खरी शिवसेना ही आपल्यासमोर या गर्दीत आहे. ही पाहा संपूर्ण जळगावातली शिवसेना.

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही इथे येऊ नये, उद्धव ठाकरे यांनी इथे येऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचे अनावरण हे देशभक्त आणि स्वाभिमानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊ नये म्हणून या चार टकल्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण आम्ही आलो, उद्धवजी आले, त्यांचे भव्य स्वागत झाले. त्यांनी पाहिले आणि जिंकले. हजारोंच्या संख्येने इथे लोक जमले आहेत. आजच्या सभेने त्या चार टकल्यांना धडकी भरली असेल. उद्यापासून ते बाहेर पडणार नाहीत.

रोख कोणाकडे, चर्चेला उधाण

संजय राऊत यांनी या वक्तव्याद्वारे प्रामुख्याने पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर पारोळ्याचे आ.चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आ. किशोर पाटील आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आ.चंद्रकांत पाटील (शिवसेनेचे सहयोगी आमदार) या नेत्यांकडे संजय राऊत यांच्या टीकेचा रोख होता, असा चर्चेतला सूर उमटत आहे.

मनपात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी जळगाव महानगरपालिकेत अनावरण करण्यात आले. हा सोहळा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. याव्ोळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्टॅच्यू ऑफ युनिटी, मणिपूर आणि भारतवरून टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, स्टेजवर उभा राहिल्यानंतर स्टेज हलू लागला आहे. मनात विचार केला की, स्टेज कसं हलतंय, एकूण केंद्र सरकार डगमगायला लागलंंय त्याच हे प्रतिक आहे. केंद्र सरकार हलतंय. पुतळा कोणाचाही उभा करता येतो. काम करून जनतेने उपाधी दिल्याची काही तुरळक माणसे होऊन गेली. त्यात पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांचा पुतळा महानगरपालिकेच्या आवारात उभारलात आणि त्याचे अनावरण करण्याची संंधी दिली यासाठी मी आभार मानतो, असेही ठाकरे म्हणाले.

कामाची उंची कधी गाठणार?

सरदार वल्लभभाई पटेल हा माणूस दुरदृष्टीचा होता. त्याव्ोळी त्यांनी आरएसएसवर बंदीही आणली होती. जगातला सर्वांत मोठा पुतळा कुठे उभा केला माहिती आहे. पुतळ्याची उंंची ठीक आहे, कामाची उंची कधी गाठणार? असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांना लगावला.

‘इंडिया’ बोलल्यावर खाज सुटली

आता भारत बोलले पाहिजे, इंडिया बोलल्यावर खाज सुटायला लागली. इंडियाचा गवगवा केला होता. व्होट फॉर इंडियाचे नारे दिले होते. पण आम्ही इंडिया बोलल्यावर त्यांना खाज सुटली, अशी जोरदार टीकाही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाच्या नेत्यांवर केली.

मनपात भव्य स्वागत

रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उध्दव ठाकरे यांचे जळगाव महानगरपालिकेच्या आवारात आगमन झाले. तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, समाधान महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, पाचोरा येथील वैशाली सूर्यवंशी, महानंदा पाटील, गायत्री सोनवणे, गजानन मालपुरे, माजी महापौर नितीन लढ्ढा, प्रशांत सुरळकर, विराज कावडिया आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सरदार पटेल यांनी आधीची भाजप अर्थात संघावर टिका केली असल्याचा खा.संजय राऊत यांनी दाखला दिला. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे सरदार आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक महापौर जयश्री महाजन तर आभार उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here