साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयात आजी-आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करत आजी-आजोबा दिन साजरा झाला. यावेळी उपस्थित आजी-आजोबांसाठी संगीत खुर्ची, गायन स्पर्धाही घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंजूषा नानकर होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ उपशिक्षक जिजाबराव वाघ उपस्थित होते.
संगीत खुर्ची स्पर्धेत २०हून अधिक आजी सहभागी झाल्या होत्या. त्यात रत्नाबाई साहेबराव चौधरी तर गायन स्पर्धेत मंगलाबाई अरुण कोळी या आजींनी बाजी मारली. त्यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
फुलांच्या पाकळ्या अंथरुण स्वागत
सोहळ्यासाठी उपस्थित आजी-आजोबांचे फुलांच्या पाकळ्या अंथरुण स्वागत करण्यात आले. नातवंडांनी खास आपल्या हातांनी तयार करुन आणलेली भेटकार्डे आजी-आजोबांना दिली. आपल्या नातवंडांचे निरागस प्रेम पाहतांना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले होते. विद्यार्थी नातवंडांनी आपल्या आजी-आजोबांविषयी मनोगत व्यक्त केली.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी अनिल महाजन, मनिषा सैंदाणे, शर्वरी देशमुख, सचिन चव्हाण, अजयराव सोमवंशी, प्रशांत महाजन, स्मिता अमृतकार, दीपाली चौधरी, कविता साळुंखे, रेखा चौधरी, रंजना चौधरी, सचिन पाखले, दत्तात्रय गवळी, रोहित चव्हाण यांनी परिश्रम घेतले.