जना स्मॉल फायनान्स बँकेकडून नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेस वॉटर प्युरिफायर सिस्टीमचे हस्तांतरण

0
4

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.एन.आर.जी. इंग्लिश मीडियम स्कूल, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वॉटर प्युरिफायर (R.O.) सिस्टीमचे संस्थेस जना स्मॉल फायनान्स बँकेकडून हस्तांतरण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समता फाउंडेशन रिसोड, जि. वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डाचे वाटपासह नोंदणी, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम नुकतेच झाले. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते.

यावेळी बँकेचे विभागीय प्रमुख प्रशांत गोरकल, क्षेत्र प्रमुख ज्ञानेश्वर पाटकर, समता फाउंडेशन रिसोड, जि. वाशिमचे पदाधिकारी अतुल महाजन, ॲड. घनश्याम पाटील, भुपेंद्रभाई गुजराथी, डी.पी साळुंखे, डॉ. चंद्रकांत बारेला, पुणे येथील डॉ. प्रवीणकुमार सप्तर्षी, रमा सप्तर्षी, योगी मयूर, संस्थेचे उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील, मदन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पदाधिकारी, परिसरातील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा तसेच इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षणाची गरज व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यातून मिळणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी चोपडा तालुका राष्ट्रवादी पक्ष व समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांसाठी आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी व वाटप केले. अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराथी यांनी संस्था व विद्यालयाने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.

यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर. पी. चौधरी, एस.एन. आर.जी. इंग्लीश मीडियम स्कूलच्या प्राचार्या जेनिफर मथायस, आयटीआयचे प्राचार्य प्रसाद बाविस्कर, पर्यवेक्षक व्ही.ए.नागपुरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. एस. पी. बिऱ्हाडे तर आभार प्रा. आय. आर. राजपूत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here