मानवाधिकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्षपदी भोजराज आमले

0
4

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

समाजसेवेची आवड असणारे आणि अन्यायाविरुद्ध लढा देणारे व्यक्तीमत्त्व अशी ओळख असणारे भोजराज आमले यांची मानव अधिकार संरक्षण समितीच्या चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. मानव अधिकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांनी चाळीसगाव तालुक्याची जबाबदारी आमले यांच्याकडे सोपविली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, सर्व सामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न तसेच निस्वार्थी सेवा अशी कारकीर्द असलेल्या भोजराज आमले यांना भोकरदन, जि.जालना येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन समाजसेवेची संधी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here