साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने मोठा खंड दिला आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच सरकारद्वारे पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ योजना जाहीर केली होती. त्यानंतर पुन्हा निकर्षात मोठा बदल करून ९५९ महसूल मंडळांचा समावेश दुष्काळात केला आहे. त्यामुळे दुष्काळी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यानुसार आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने मतदार संघातील रावेर, बोदवड व मुक्ताईनगर या तीनही तालुक्यातील सुमारे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी पं.स.चे माजी सभापती बापू दशरथ पाटील, मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे, जि.प.चे माजी सदस्य पवन सोनवणे, शेतकी संघाचे संचालक संजय माळी, जांभोरेचे उपसरपंच शुभम चव्हाण, युवा सेना विधानसभा क्षेत्रप्रमुख आबा माळी, अल्पसंख्याक आघाडी उपतालुका प्रमुख दानिश पठाण, विभागप्रमुख किशोर पाटील सारवे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख तुषार पाटील, शेख कालू, साकरेचे सरपंच शरद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे ठाकूर समाजाच्यावतीने आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम भाऊसाहेब गुलाबराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात नुकताच घेण्यात आला. जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन पाळधी बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी जननायक यांच्या कार्याच्या विचाराच्या त्याचप्रमाणे आदिवासी समाजाचे प्रेरणा स्रोत म्हणून नामोल्लेख करत त्यांचे विचार समाजातील लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवा ते विचार पोहोचतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जयंती साजरी करत असल्याचे सर्वांना दिसेल, असे प्रतिपादन ठाकूर समाजाचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी मार्गदर्शन करताना केले. यावेळी दत्तू नाना ठाकूर, राहुल ठाकूर, गजानन ठाकूर, सुनील ठाकूर,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव ते हिरापूर दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या ४४ लोखंडी प्लेटा व २ टन आसारी असे सुमारे ४ लाख ५४ हजार ७४० रूपयांचे साहित्य कामावरील सुपरवायझरने कोणाला तरी विकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी साईट सुपरवायझरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जळगाव ते हिरापूर दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. हे काम बीएनए इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., भुसावळ या कंपनीने घेतले आहे. साईट सुपरवायझर नितीन भारती (रा. हिसवळ, ता. नांदगाव, जि. नाशिक) याने ३ लाख ४४ हजार ७४० रूपये किंमतीच्या ४४ लोखंडी प्लेटा व १ लाख १० हजार रूपये किंमतीच्या २…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन घरातून १ लाख ६५ हजाराच्या रोकडसह सोने चांदीचे दागिने असा सुमारे २ लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील रोहिणी येथे घडली. सविस्तर असे की, नांदगाव पंचायत समितीत कनिष्ठ सहाय्यक म्हणून वाल्मिक वसंत दिघोळे (वय ४१) हे कार्यरत आहेत. ते कुटुंबासह रोहिणी गावी राहतात. ते पत्नी व मुले यांच्यासह भाऊबीजनिमित्त चौका, जि. छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. त्यामुळे रोहिणी येथील घर बंद होते. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दिघोळे यांच्या घराच्या कंपाऊंडचे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र अँम्युचेर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्यावतीने येत्या २८ ते ३० नोव्हेंबर २०२३ रोजी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे होणाऱ्या १७ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर (१९ वर्षाआतील) नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे मुले व मुलींचे दोन्ही संघ सहभागी होणार आहे. त्याकरीता जळगाव जिल्हा निवड चाचणी मु.पो.यशवंत पब्लिक स्कूल, वाघळी, ता.चाळीसगाव नेटबॉल मैदानावर रविवारी, १९ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे. १ मार्च २००५ नंतर जन्मलेले खेळाडू चाचणीत सहभागी होवू शकतील. आधार कार्ड झेरॉक्स, ५ पासपोर्ट फोटो, बोनाफाईड, जन्मदाखला सर्व कागदपत्रांची ५ प्रत आदी कागदपत्रांसह जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थितीत रहावे, असे…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील नि.प. पाटील विद्यालयात एसएससी १९९३ च्या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रंगल्याने माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षस्थानी हिरालाल राजपूत होते. सुरवातीला खुशी पांडे हिने ‘सत्यम शिवम सुंदरम्’ या गाण्याने सुरवात करून वातावरणात प्रसन्नता निर्माण केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक डब्ल्यू.एस.पाटील, एस.एस.पाटील उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थिनी यांचे पती यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले. त्यानंतर गुरुजनांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच आलेल्या पाहुण्यांना आपल्या परंपरेनुसार रुमाल, टोपी, गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. मेळाव्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःचा व…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या राहत्या घरी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमा पूजन सोहळा वैशाली सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे यांच्या हस्ते शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, नरेंद्र सूर्यवंशी, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख ॲड.दीपक पाटील, विलास पाटील, योगेश पाटील, भारत पाटील, गोपाल परदेशी, उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन, रमेश पाटील, जितेंद्र महाजन, राजू पाटील, अन्नू शेख, आबा पाटील, अभिषेक खंडेलवाल, देवा पाटील, चंद्रकांत पाटील, कृष्णा पाटील, पंढरीनाथ पाटील, रमेश वाणी,…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर लोहारा परिसरात यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला. धरणावर लोहारा गावाला पाणीपुरवठा केला जातो. मागच्यावर्षी संपूर्ण धरण कोरडे पडून पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. शासनाच्यावतीने वीस ते पंचवीस दिवसांनी पाण्याचे टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मुक्या जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते, हे चित्र लोहारेकरांच्या डोळ्यासमोर असतानाही धरणामध्ये रोज सर्रासपणे अवैध उपसा केला जात आहे. यासंदर्भात संबंधित अधिकारी शांत आहे. वेळेवर उपाययोजना करा अन्यथा लोहारेकरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यासाठी काही काळ वीज महावितरणने धरण परिसरातील वीज पुरवठा बंद ठेवावा. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने धरण परिसरातील मोटारी जप्त करून कारवाई…
साईमत, कजगाव, ता. भडगाव : वार्ताहर येथे अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने कजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बस्थानक परिसरातील सावता माळी चौक भागातील शिवाजी नथ्थु महाजन (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. दिवसभर काबाडकष्ट करून ते पूर्णवेळ शेतकरी म्हणून काम करीत होते. मात्र, अशा कष्टाळू शेतकऱ्यांच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले आहे. दिवाळी होऊन दोन दिवस होत नाही तोच अश्या पद्धतीने शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याने कजगाव परीसरात शोक व्यक्त होत आहे. पावसाने मारलेल्या दांडीने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. शेतातील उत्पन्न ७० टक्यांपेक्षा अधिकचे घटल्याने शेतकरी मोठ्या…