साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे ठाकूर समाजाच्यावतीने आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम भाऊसाहेब गुलाबराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात नुकताच घेण्यात आला. जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन पाळधी बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आदिवासी जननायक यांच्या कार्याच्या विचाराच्या त्याचप्रमाणे आदिवासी समाजाचे प्रेरणा स्रोत म्हणून नामोल्लेख करत त्यांचे विचार समाजातील लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवा ते विचार पोहोचतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जयंती साजरी करत असल्याचे सर्वांना दिसेल, असे प्रतिपादन ठाकूर समाजाचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी मार्गदर्शन करताना केले.
यावेळी दत्तू नाना ठाकूर, राहुल ठाकूर, गजानन ठाकूर, सुनील ठाकूर, महेश ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य भूषण ठाकूर, चंदू इंगळे, चंद्रशेखर ठाकूर, उमेश ठाकूर, चेतन ठाकूर, संजीव ठाकूर, मयूर ठाकूर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. सूत्रांचालन शंकर निकम तर भिकन ठाकूर यांनी आभार मानले.