बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

0
34

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी पं.स.चे माजी सभापती बापू दशरथ पाटील, मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे, जि.प.चे माजी सदस्य पवन सोनवणे, शेतकी संघाचे संचालक संजय माळी, जांभोरेचे उपसरपंच शुभम चव्हाण, युवा सेना विधानसभा क्षेत्रप्रमुख आबा माळी, अल्पसंख्याक आघाडी उपतालुका प्रमुख दानिश पठाण, विभागप्रमुख किशोर पाटील सारवे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख तुषार पाटील, शेख कालू, साकरेचे सरपंच शरद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here