साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
जळगाव ते हिरापूर दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या ४४ लोखंडी प्लेटा व २ टन आसारी असे सुमारे ४ लाख ५४ हजार ७४० रूपयांचे साहित्य कामावरील सुपरवायझरने कोणाला तरी विकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी साईट सुपरवायझरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, जळगाव ते हिरापूर दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. हे काम बीएनए इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., भुसावळ या कंपनीने घेतले आहे. साईट सुपरवायझर नितीन भारती (रा. हिसवळ, ता. नांदगाव, जि. नाशिक) याने ३ लाख ४४ हजार ७४० रूपये किंमतीच्या ४४ लोखंडी प्लेटा व १ लाख १० हजार रूपये किंमतीच्या २ टन आसारी असा सुमारे ४ लाख ५४ हजार ७४० रूपये किंमतीचे साहित्य ६ ऑक्टोबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान कंपनीचा विश्वासघात करून परस्पर कोणाला विकून अपहार केला. याप्रकरणी सुपरवायझर अजय रवींद्र चौधरी (जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन भारती याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भा.दं.वि. कलम ४०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.