Author: Sharad Bhalerao

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी अतिक्रमित जागेवर ताबा करून ग्रा.पं.ला नोंद असलेल्या जागे व्यतिरिक्त भरमसाठ जागा ताब्यात घेणाऱ्या मायलेकांसोबत तिघांनी रस्ता अडविल्याप्रकरणी अपंग बांधव रामा धोंडू दोळे, लक्ष्मण धोंडू दोळे यांच्यासह कुटुंबीयांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, पोलीस स्टेशनसह शासकीय प्रशासन आदींना निवेदन देऊन पाच दिवसात रस्ता मोकळा न केल्यास प्रजासत्ताक दिनी पंचायत समिती कार्यालयासमोर सह कुटुंबियांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला होता. त्या निवेदनाची व आमरण उपोषणाची धास्ती घेत ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याची मोजणी करून विजय दिनकर दोळे आणि दिलीप जयंत बावस्कर यांच्या दोघांचे ताब्यातील अतिक्रमित बखळ जागेतून आठ फूट रुंदीचा रस्ता दोघांच्या संमतीने अपंग दोळे बांधवांसाठी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय ग्रामपंचायत…

Read More

साईमत, रावेर : प्रतिनिधी शहरातील शाळांमध्ये ‘मानव व वन्यजीव संघर्ष निवारण वन वणवा आणि अतिक्रमण’ विषयावर वन विभागातर्फे जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वनक्षेत्रपाल अजय बावणे यांनी मार्गदर्शन केले. यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व वन्यजीव चोपडा यांच्या मार्गदर्शनाने वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्यासह रावेर वनक्षेत्रातील सरस्वती विद्या मंदीर आणि स्वामी इंग्लिश विवेकानंद मीडियम स्कुल येथे ‘मानव व वन्यजीव संघर्ष निवारण वन वणवा आणि अतिक्रमण’ विषयावर जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. संचालक अजिंक्य भांबुरकर यांनी मानव-वन्यजीव संघर्ष कार्यशाळा घेऊन मुलांना सादरीकरण केले. तसेच त्या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारून शालेयपयोगी बक्षीस देण्यात आले. तसेच वनरक्षक युवराज मराठे…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि यावल नगरपालिकाच्या प्रभारी प्रशासक म्हणून असलेल्या आयएएस महिला अधिकारी देवयानी यादव यांच्या आणि यावल नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यक्षेत्रात ५ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावल शहरात ठराविक ठिकाणी स्वच्छता अभियान करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असेल. परंतु यावल शहरात आजही अनेक ठिकाणी महास्वच्छता अभियानाचा बोजवारा कसा उडाला हे प्रत्यक्ष दिसून येत आहे. त्यामुळे न.पा.चा कारभार प्रशासक अन्‌ प्रभारी कारभारामुळे विस्कळीत झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. अभियाना अंतर्गत राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन विकास मंत्री गिरीश महाजन यांनीही बऱ्याच ठिकाणी उपस्थित…

Read More

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या धानोरा गावात एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लाखो रुपये खर्चुन बांधकाम झालेल्या केंद्रात शवविच्छेदन गृहाचे बांधकामच झालेले नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही शवाची (मयत शरीराची) अवहेलना झाल्याच्या अनेक घटना परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे धानोरा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह तयार करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चार उपकेंद्र येतात. त्यात धानोरा, पंचक, देवगाव, बिडगाव यांचा समावेश आहे. या उपकेंद्राला लागुनच ११ गावे, ११ वस्ती, पाडे जोडलेली आहेत. त्याच ठिकाणी लागूनच सातपुडा पर्वतात वसलेले अतीदुर्गम भागातील वस्त्यांवर, पाड्यावर व गावात अनेकवेळा अप्रिय घटना घडतात. त्यात विषबाधित, जळीत, अपघाती, बुडून मृत्यू…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा आणि महाराष्ट्र शासन, महसूल तथा निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती विषयावर रांगोळी स्पर्धा, निवडणुकीतील मतदानाचे महत्त्व विषयावर निबंध स्पर्धा व नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदानाचा अधिकार व कर्तव्याचे महत्त्व पटवून सांगितले. प्रास्ताविकेत प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी लोकशाहीत मतदार म्हणून आपली भूमिका किती महत्त्वाची आहे? राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी यांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले मल्हारगड आणि कन्हेरगड येथे भगवा फडकवित दीपोत्सवात श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा केला. संपूर्ण देशभर अयोध्यातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा होत असतानाच सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगड येथे २२ जानेवारी रोजी रात्री खंडोबा मंदिराच्या दीपमाळेवर दिव्यांची रोषणाई करून परम पवित्र भगवा ध्वज येथील ध्वज स्तंभावर वाढविण्यात आला. तसेच कन्हेरगड येथे दुपारी भगवा ध्वज फडकविण्यात आला. प्रभू रामचंद्रांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात दोन्ही किल्ल्यांवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी हा आनंद उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, तालुका…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे पुढील महिन्यात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. संमेलनपूर्व होत असलेल्या बालमेळाव्यानिमित्त चिमुकलेही पुढे सरसावले आहेत. बालमेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी अमळनेर शहरातील काही चिमुकले शाळा व खासगी क्लासेसमध्ये जावून विद्यार्थ्यांना आवाहन करत आहेत. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी नेहा राकेश पाटील, हिमानी मिलिंद पाटील, मृणल पंकज पाटील, रीचल संदेश पाटील यांच्यासह इयत्ता अकरावीचे विद्यार्थी अखिलेश मनोज पाटील, चंदन भिका चौधरी, अभय साहेबराव सोनवणे, रितेश विवेक भामरे, जतिन आनंद शेळके या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य संमेलन व बालमेळाव्याच्या प्रसिध्दीसाठी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भेटी घेतल्या. विद्यार्थ्यांच्या भुमिकेचे…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी अहमदनगर येथील स्पर्श सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय कलाविष्कार २०२४ प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने येथील प्रियंका विजय देवरे हिला नुकतेच सन्मानित करण्यात आले. तिला कथ्थक नृत्यकला व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानपत्र, शाल, मानाचा फेटा, मेडल, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. तिला हा पुरस्कार पद्मश्री स्व.सिंधुताई सपकाळ यांच्या सुकन्या ममता सपकाळ, सिंधुतार्इंचे मानसपुत्र विजय सपकाळ, विधानसभा सदस्य प्राजक्त तानपुरे, शुभांगी पाटील, अध्यक्ष टीचर्स असोसिएशन आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तिला मिळालेल्या पुरस्कारामुळे तिने चाळीसगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रियंकाने विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच तिला आतापर्यंत राज्यस्तरीय कलार्पण, उमंग, कलानंद कथ्थक नृत्य संस्था बाबाज…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या प्रांगणात नुकतेच उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनातून विविध विषयांबद्दल जनजागृतीसह वेगवेगळ्या मनोरंजक गीत व नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी धमाल केली. संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र शासन मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. सरस्वती वंदना व गणेश वंदना सादर केली. तसेच विविध मनोरंजनात्मक गीतांवर धमाल नृत्य सादर करत सुमारे १ हजार ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पंडितराव शिंदे, सचिव ॲड. जे.डी. काटकर, सहकार नेते सतीश शिंदे, भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मुणोत, सहसचिव…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी नाशिक विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील जी.जी.बलसाणे यांची जळगाव येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी बुधवारी, २४ जानेवारी २०२४ रोजी आदेश काढून तात्काळ रुजू होण्याचे नमूद केले आहे. हा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढल्याचेही नमूद केले आहे. आदेशाच्या प्रती माहितीस्तव सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे., साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त, वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर, सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन व लेखापरिक्षण) द्वारा सहकार आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत.

Read More