एम. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम

0
3

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा आणि महाराष्ट्र शासन, महसूल तथा निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती विषयावर रांगोळी स्पर्धा, निवडणुकीतील मतदानाचे महत्त्व विषयावर निबंध स्पर्धा व नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदानाचा अधिकार व कर्तव्याचे महत्त्व पटवून सांगितले. प्रास्ताविकेत प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी लोकशाहीत मतदार म्हणून आपली भूमिका किती महत्त्वाची आहे? राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी यांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून निवडणुकीच्या प्रक्रियेत तरुणांनी निर्णय भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मंचावर प्रभारी तहसीलदार संभाजी पाटील, नायब तहसीलदार सुभाष कुंभार, नायब तहसीलदार रणजीत पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, समन्वयक प्रा. एस. टी. सूर्यवंशी यांच्यासह निवडणूक शाखेतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक जागृती राजेंद्र पाटील, द्वितीय वैष्णवी सतीश निकम, तृतीय नंदिनी धनवीर गुरखा, उत्तेजनार्थ श्‍वेता विजय दंडगव्हाळ, गायत्री श्रीकृष्ण क्षीरसागर यांना विभागून बक्षीस देण्यात आले. लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम भाग्यश्री रवींद्र पाटील, द्वितीय योगेश्‍वरी राजेंद्र पाटील, तृतीय कविता विलास माळी, उत्तेजनार्थ तनया लक्ष्मण जाधव यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यासोबत विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

कार्यक्रमाला उमेश वाडेकर, डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. अतुल सूर्यवंशी, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. शरद पाटील, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. नितीन पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. विशाल पाटील, प्रा. आर. आर. पाटील, डॉ. सीमा सैंदाणे, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. संजीदा शेख, मच्छिंद्र पाटील, गणेश चौधरी, जावेद देशमुख, घन:श्‍याम करोसिया, जयेश कुमावत यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमातील पारितोषिकांची उद्घोषणा डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे तर आभार प्रा. स्वप्नील भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here