सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मल्हारगड, कन्हेरगडावर फडकविला भगवा

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले मल्हारगड आणि कन्हेरगड येथे भगवा फडकवित दीपोत्सवात श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा केला. संपूर्ण देशभर अयोध्यातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा होत असतानाच सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगड येथे २२ जानेवारी रोजी रात्री खंडोबा मंदिराच्या दीपमाळेवर दिव्यांची रोषणाई करून परम पवित्र भगवा ध्वज येथील ध्वज स्तंभावर वाढविण्यात आला. तसेच कन्हेरगड येथे दुपारी भगवा ध्वज फडकविण्यात आला.

प्रभू रामचंद्रांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात दोन्ही किल्ल्यांवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी हा आनंद उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, तालुका प्रमुख गणेश पाटील, तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र वाघ, शहर प्रमुख सचिन पाटील, नाना चौधरी, राहुल पवार, भाऊसाहेब पाटील, बबलू चव्हाण, अभिषेक गुंजाळ, मयूर भागवत, धनंजय कुलथे, नृतेश भागवत, राहुल पाटील, विराज वाघ, यश पाटील यांच्यासह दुर्गसेवक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here