रस्ता अडविल्याप्रकरणी आमरण उपोषणाची प्रशासनाकडून दखल

0
1

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

अतिक्रमित जागेवर ताबा करून ग्रा.पं.ला नोंद असलेल्या जागे व्यतिरिक्त भरमसाठ जागा ताब्यात घेणाऱ्या मायलेकांसोबत तिघांनी रस्ता अडविल्याप्रकरणी अपंग बांधव रामा धोंडू दोळे, लक्ष्मण धोंडू दोळे यांच्यासह कुटुंबीयांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, पोलीस स्टेशनसह शासकीय प्रशासन आदींना निवेदन देऊन पाच दिवसात रस्ता मोकळा न केल्यास प्रजासत्ताक दिनी पंचायत समिती कार्यालयासमोर सह कुटुंबियांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला होता. त्या निवेदनाची व आमरण उपोषणाची धास्ती घेत ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याची मोजणी करून विजय दिनकर दोळे आणि दिलीप जयंत बावस्कर यांच्या दोघांचे ताब्यातील अतिक्रमित बखळ जागेतून आठ फूट रुंदीचा रस्ता दोघांच्या संमतीने अपंग दोळे बांधवांसाठी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. तब्बल तीन वर्षांच्या संघर्षानंतर रस्ता मिळाल्याने अपंग बांधव रामा धोंडू दोळे, लक्ष्मण धोंडू दोळे यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्यासह उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी मलकापूरचे ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप काळे, सरपंच प्रियंका श्रीकांत खर्चे, ग्रामपंचायत सचिव जयश्री दीपक नाफडे, शिवसेना शहरप्रमुख तथा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, पोलीस पाटील अशोक बावस्कार, ग्रा.पं.सदस्या पंचफुला अर्जुन बावस्कार, बिट जमादार दिलीप तडवी, दिलीप दोळे, तुषार दोळे, महादेव दोळे, निखिल बावस्कार, सुनील दोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here