रावेरला वन विभागातर्फे ‘वन वणवा’ अतिक्रमणाविषयी जनजागृती

0
3

साईमत, रावेर : प्रतिनिधी

शहरातील शाळांमध्ये ‘मानव व वन्यजीव संघर्ष निवारण वन वणवा आणि अतिक्रमण’ विषयावर वन विभागातर्फे जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वनक्षेत्रपाल अजय बावणे यांनी मार्गदर्शन केले.

यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व वन्यजीव चोपडा यांच्या मार्गदर्शनाने वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्यासह रावेर वनक्षेत्रातील सरस्वती विद्या मंदीर आणि स्वामी इंग्लिश विवेकानंद मीडियम स्कुल येथे ‘मानव व वन्यजीव संघर्ष निवारण वन वणवा आणि अतिक्रमण’ विषयावर जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

संचालक अजिंक्य भांबुरकर यांनी मानव-वन्यजीव संघर्ष कार्यशाळा घेऊन मुलांना सादरीकरण केले. तसेच त्या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारून शालेयपयोगी बक्षीस देण्यात आले. तसेच वनरक्षक युवराज मराठे यांनी पक्षी व सापाविषयी पीपीटीद्वारे माहिती दिली. कार्यक्रमाला राजेंद्र पवार (संचालक, स्वामी इंग्लिश विवेकानंद मेडीयम स्कुल रावेर), श्री.जैन (मुख्याध्यापक सरस्वती विद्या मंदीर) रावेर वनक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here