शिंदे इंटरनॅशनल स्कुलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांची जनजागृतीसह मनोरंजक धमाल

0
3

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या प्रांगणात नुकतेच उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनातून विविध विषयांबद्दल जनजागृतीसह वेगवेगळ्या मनोरंजक गीत व नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी धमाल केली. संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र शासन मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. सरस्वती वंदना व गणेश वंदना सादर केली. तसेच विविध मनोरंजनात्मक गीतांवर धमाल नृत्य सादर करत सुमारे १ हजार ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पंडितराव शिंदे, सचिव ॲड. जे.डी. काटकर, सहकार नेते सतीश शिंदे, भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मुणोत, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, संस्थेच्या सी. ई.ओ.पूजा शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, प्राचार्य डॉ. विजय पाटील उपस्थित होते. संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा.शिवाजी शिंदे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. तसेच अमोल शिंदे यांनी विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी विचार व्यक्त केले. उद्घाटक डॉ. शामकांत देवरे यांनी विद्यार्थी व पालकांचे कौतुक करत शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.

सुमारे चार तास चाललेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध, झाडे वाचवा झाडे जगवा, चंद्रयान -३, नारी शक्ती हीच महान शक्ती, प्लास्टिक बंदी, हिंदू मुस्लिम एकता, राष्ट्रीय एकात्मता, शेती व शेतकरी, मराठी- हिंदी चित्रपट गीते आदी विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

शिंदे स्कुलच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून केलेले सूत्रसंचालन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. याद्वारे ‘भारतीय मूल्याधिष्ठित शिक्षणासोबतच आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा ध्यास’ असलेले संस्थेचे ब्रीदवाक्य सार्थ ठरले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे यांच्या जीवन परिचयावरील चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमासाठी गिरणाई शिक्षण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कुलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाला मोहसीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here