साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सतिष पाटील यांनी दीपप्रज्ज्वलन करून प्रतिमापूजन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुषार खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध लेझीम नृत्य, देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटक व कला सादर केल्या. तसेच रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचेे आयोजन केले होते. विविध क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत देवळी यांच्याकडून सत्कारही करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी तसेच संस्थेच्या संचालिका जयश्री सूर्यवंशी, सचिव आदित्य सूर्यवंशी यांनी विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजय नाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संस्थेचे कार्याध्यक्ष तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत पाटील यांच्यातर्फे ‘नमो नवमतदाता’ संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात नवलभाऊ प्रतिष्ठान अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, व माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. भव्य अशा डिजिटल स्क्रीनवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मतदार तथा विद्यार्थ्यांशी थेट संवादाचे लाईव्ह प्रक्षेपण केले होते. प्रास्ताविक आर्मी स्कुल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पी.एम.कोळी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून भारताची प्रगतीकडे असलेली वाटचाल व त्यात युवकांचा सहभाग याविषयी सांगून नवीन मतदार नोंदणीमध्ये युवकांनी सक्रिय…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै.पी.के. शिंदे माध्यमिक विद्यालयात नुकताच विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पंडितराव शिंदे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सतीश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कलागुणांचा भरभरून आनंद घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव ॲड. जे.डी. काटकर, उपाध्यक्ष नीरज मुणोत, युवा नेते अमोल शिंदे, सहसचिव प्रा.शिवाजी शिंदे, न.पा.चे माजी सदस्य सिंधुताई शिंदे, केंद्रप्रमुख अभिजीत खैरनार, मुख्याध्यापिका पूजा शिंदे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, ॲड. ललिता पाटील, दिगंबर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपाध्यक्ष नीरज मुणोत, सहसचिव प्रा.…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी लोकमान्य शिक्षण मंडळाच्या बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा आणि लोकमान्य विद्यालयात अयोध्या येथे झालेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा स्थापनेचे औचित्य साधून अमळनेर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन केले होते. शोभायात्रेत तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शोभायात्रेत प्रभू श्रीराम, माता सीता तसेच लक्ष्मण, हनुमान यांची भूमिका विद्यार्थ्यांनी साकारली. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे नागरिकांनी दर्शन घेतले. तसेच अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले दिसून आले. प्रथम विद्यालयात तब्बल १०८ विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या राम रक्षा स्तोत्राचे पठण केले. त्यांना लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डॉ.प्र.ज.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डॉ.प्र.ज.जोशी, नवीन मराठी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे पुढील महिन्यात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे लोककलांचे सादरीकरण त्या-त्या लोककलांचे तज्ज्ञ व पारंपरिक पद्धतीने सादरीकरण करणारी मंडळे सादर करणार आहेत. संमेलनात खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. येत्या ३ फेबु्रवारी रोजी दुपारी २.३० ते ४.३० वा. सभामंडप ३ – बालकवी-त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात लोककला/लोकसंगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचे संयोजन बापू हटकर व रमेश धनगर करणार आहेत. कार्यक्रमात खान्देशी वीरनृत्य, बंजारा नृत्य, धनगरी नृत्य, आदिवासींची पावरी नृत्य, नंदीबैल नृत्य, डोगऱ्यादेव वळीत नृत्यांबरोबरच खान्देशी वन्हे, तमाशा बतावणी, टिंगरी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांच्या तलवार शरीफ मिरवणुकीस शनिवारी, २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जुन्या नगरपरिषद जवळून भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. यावर्षी तलवार पकडण्याचा मान दर्शन देशमुख यांना मिळाला होता. धुनीचा मान विजय देशमुख व त्यांचे चिरंजीव यांना मिळाला होता. यावेळी देशमुख बांधव व शहर काजी नाजीमोदिन काझी यांच्यासह लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. तलवार मिरवणूक बाजार रांजणगाव दरवाजा पाटणादेवी रोड व दर्गात सायंकाळी साडे सात वाजता पोहचली. यावेळी चाळीसगाव शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यानिमित्त लाखो भाविक चाळीसगाव शहरात दाखल झाले होते.
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथे जीपीएस मित्र परिवाराच्यावतीने प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाकरीता गावातील विविध ठिकाणी विद्यार्थी प्रभात फेरीच्या माध्यमातून जात असतात. प्रभात फेरीत सहभागी असलेल्या व शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरातील रस्त्याने फिरत असणाऱ्यांना अन्न, वस्त्र, निवारा नसणाऱ्या निराधार, भटक्या गरजूंना कपडे व ब्लँकेटचे वाटप केले. तसेच जळगावकडे व धरणगाव-एरंडोलकडे जाण्याच्या मार्गावर म्हणजेच गावाच्या दोघे बाजूच्या मुख्य रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. असा कौतुकास्पद उपक्रम राबवत जीपीएस मित्र परिवाराने गणराज्य दिन साजरा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, लोकनियुक्त सरपंच विजय पाटील यांच्यासह जीपीएस मित्र परिवाराचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील रिक्षा चालक अजितसिंग विठ्ठलसिंग राजपूत (रा. महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी, चाळीसगाव) यांना रिक्षात सापडलेली ६० हजाराची सोन्याची ११ ग्रॅम वजनाची पोत बॅगसह पोलिसांच्या कामगिरीमुळे प्रवाशाला सुपूर्द केली. त्यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाची बॅग परत करुन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक हेोत आहे. चाळीसगाव शहरातील रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षात प्रवाशांचे काहीएक सामान बॅग, मोबाईल फोन, तसेच मौल्यवान वस्तू मिळुन आल्यास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे पोलिसांतर्फे आवाहन केले आहे. सविस्तर असे की, २५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास सुदाम सोपानराम माकोडे (रा. रांजणगाव, एमआयडीसी वाळुंज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे त्यांच्या…
साईमत, यावल : प्रतिनिधी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कुलमध्ये महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम २७ जानेवारी रोजी घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सारिका पाटील (पोलीस कॉन्स्टेबल यावल), निर्मला महाजन, मंगला फेगडे, सरस्वती विद्यामंदिर शाळेचे नरेंद्र महाले उपस्थित होते. सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. नरेंद्र महाले यांनी मुलगी व आई नात्यावर भाषण करून सर्व महिलांना माहिती दिली. नंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हळदी कुंकुवामध्ये महिलांसाठी उखाणे तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच महिलांना वाणही देण्यात आले. यावेळी राजेंद्र महाजन, निर्मला महाजन यांच्या…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालय मलकापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयसीआयसीआय लॉबार्ड मुंबई येथील विनोद महाजन, राजीव गांधी तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील प्रा.एस. डी. पाटील यांची उपस्थिती लाभली. यावेळी विनोद महाजन, प्रा.एस. डी. पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, असे संबोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाला प्रशासकीय डीन युगेश खर्चे, नितीन खर्चे, रमाकांत चौधरी, संतोष शेकोकार, संदीप खाचणे, राजेश…