अमळनेरला श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त निघाली शोभायात्रा

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

लोकमान्य शिक्षण मंडळाच्या बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा आणि लोकमान्य विद्यालयात अयोध्या येथे झालेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा स्थापनेचे औचित्य साधून अमळनेर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन केले होते. शोभायात्रेत तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शोभायात्रेत प्रभू श्रीराम, माता सीता तसेच लक्ष्मण, हनुमान यांची भूमिका विद्यार्थ्यांनी साकारली. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे नागरिकांनी दर्शन घेतले. तसेच अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले दिसून आले. प्रथम विद्यालयात तब्बल १०८ विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या राम रक्षा स्तोत्राचे पठण केले. त्यांना लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डॉ.प्र.ज.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डॉ.प्र.ज.जोशी, नवीन मराठी शाळेचे चेअरमन राजेंद्र नवसारीकर, उपाध्यक्ष प्रा.डी.डी पाटील, कार्योपाध्यक्ष राजेंद्र खाडीलकर, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र मोरे, बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका अनिता वैद्य तसेच तिन्ही शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here