बामोशी बाबा उर्सनिमित्त तलवार मिरवणूक कार्यक्रम

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांच्या तलवार शरीफ मिरवणुकीस शनिवारी, २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जुन्या नगरपरिषद जवळून भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. यावर्षी तलवार पकडण्याचा मान दर्शन देशमुख यांना मिळाला होता. धुनीचा मान विजय देशमुख व त्यांचे चिरंजीव यांना मिळाला होता.

यावेळी देशमुख बांधव व शहर काजी नाजीमोदिन काझी यांच्यासह लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. तलवार मिरवणूक बाजार रांजणगाव दरवाजा पाटणादेवी रोड व दर्गात सायंकाळी साडे सात वाजता पोहचली. यावेळी चाळीसगाव शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यानिमित्त लाखो भाविक चाळीसगाव शहरात दाखल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here