पाचोऱ्यातील कै.पी.के.शिंदे विद्यालयात कलाविष्कारांचा स्नेहमेळा उत्साहात

0
18

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै.पी.के. शिंदे माध्यमिक विद्यालयात नुकताच विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पंडितराव शिंदे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सतीश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कलागुणांचा भरभरून आनंद घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव ॲड. जे.डी. काटकर, उपाध्यक्ष नीरज मुणोत, युवा नेते अमोल शिंदे, सहसचिव प्रा.शिवाजी शिंदे, न.पा.चे माजी सदस्य सिंधुताई शिंदे, केंद्रप्रमुख अभिजीत खैरनार, मुख्याध्यापिका पूजा शिंदे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, ॲड. ललिता पाटील, दिगंबर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपाध्यक्ष नीरज मुणोत, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन केले. स्नेहसंमेलनाच्या रंगमंचावर विविध नृत्य, मूक अभिनय, पोवाडा, गीत गायन आदी कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

‘मेरे घर राम आयेंगे’, ‘अफजलखानचा वध’, ‘महाभारत’, ‘मणीकर्णीका’, ‘क्लासरूम’ आदी बहारदार कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यशस्वीतेसाठी स्नेहसंमेलन समितीचे सदस्य जी. व्ही. सोमवंशी, श्रीमती जे.डी.आहेर , व्ही. पी. देशमुख, श्रीमती वैशाली भालेराव यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. गीते, सूत्रसंचालन हेमंत टोणपे व विद्यार्थिनी अवनी, चैताली, सृष्टी, देवयानी, स्पर्श, प्रथम, रितेश तर आभार श्रीमती एस. एस. ताड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here