पाळधीला जीपीएस मित्र परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनी राबविला कौतुकास्पद उपक्रम

0
3

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

येथे जीपीएस मित्र परिवाराच्यावतीने प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाकरीता गावातील विविध ठिकाणी विद्यार्थी प्रभात फेरीच्या माध्यमातून जात असतात. प्रभात फेरीत सहभागी असलेल्या व शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरातील रस्त्याने फिरत असणाऱ्यांना अन्न, वस्त्र, निवारा नसणाऱ्या निराधार, भटक्या गरजूंना कपडे व ब्लँकेटचे वाटप केले. तसेच जळगावकडे व धरणगाव-एरंडोलकडे जाण्याच्या मार्गावर म्हणजेच गावाच्या दोघे बाजूच्या मुख्य रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. असा कौतुकास्पद उपक्रम राबवत जीपीएस मित्र परिवाराने गणराज्य दिन साजरा केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, लोकनियुक्त सरपंच विजय पाटील यांच्यासह जीपीएस मित्र परिवाराचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. याबद्दल जीपीएस मित्र परिवाराच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here