देवळीला आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
23

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सतिष पाटील यांनी दीपप्रज्ज्वलन करून प्रतिमापूजन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुषार खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध लेझीम नृत्य, देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटक व कला सादर केल्या. तसेच रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचेे आयोजन केले होते. विविध क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत देवळी यांच्याकडून सत्कारही करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी तसेच संस्थेच्या संचालिका जयश्री सूर्यवंशी, सचिव आदित्य सूर्यवंशी यांनी विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी भूषण बहिरम, दीपमाला जाधव, शरद सूर्यवंशी यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here