साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गौरी श्याम पालीवाल आणि रूपाली ईश्वर कोळी हिने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव जिल्हा अंतर्गत नुकत्याच घेतलेल्या परीक्षेत सुयश मिळविले आहे. याबद्दल त्यांचा कस्तुरबा सभागृह गांधी तीर्थ, जैन हिल्स, शिरसोली रोड, जळगाव येथे शनिवारी, २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला. विद्यार्थिनींना कार्यक्रमात प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. त्यात मार्गदर्शन करणाऱ्या विद्यार्थिनींचे पालक श्याम पालीवाल, ईश्वर कोळी यांच्यासह शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थिनींचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापक यू.डी.शेळके, पर्यवेक्षक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच धी…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चोपडा : प्रतिनिधी अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळाल्याने मराठा बांधवांकडून चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले. तसेच फटाके फोडत पेढे वाटप करून शनिवारी सायंकाळी जल्लोष व्यक्त करुन आनंद साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी चौकातून विजयी रॅली काढण्यात येऊन मेन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षण लढ्याचे मुख्य मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाला न्याय…
साईमत, रायपूर, ता.जळगाव : वार्ताहर येथील मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कुल येथे शुक्रवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दरवर्षाप्रमाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच वसंत धनगर यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो मान गावातील ज्येष्ठ नागरिक भीमसिंग परदेशी (योगेश परदेशी ठाणे, मुंबई यांचे वडील) यांना देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी मानसिंग परदेशी (माजी उपसरपंच), प्रवीण परदेशी (प्र. माजी उपसरपंच), सीताराम परदेशी, संदीप परदेशी, भीमा धनगर, जयसिंग परदेशी (मयुरेश्वर स्कुलचे सचिव), गजेंद्रसिंग परदेशी (अध्यक्ष) तसेच सर्व पालक उपस्थित होते. यावेळी भारतभूमीसाठी बलिदान देणाऱ्या शहिद जवान यांना वसंत धनगर यांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करुन अमर जवान स्मारकाच्या प्रतिकृतीसमोर ज्योत प्रज्ज्वलीत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाजकल्याण विभागाकडून प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग यांच्यावतीने पुणे समाज कल्याणचे आयुक्त यांच्या संकल्पनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या नाशिक विभागातील विभागस्तरीय कला आणि क्रीडा अविष्कार स्पर्धेचे धुळे येथे आयोजन केले होते. स्पर्धेत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार अशा पाच जिल्ह्यातील संघानी १००मी., २००मी., ४००मी., रिले, रस्सीखेच, लांबउडी, थाळीफेक यासोबत भुमिका अभिनय आणि नृत्य सादरीकरण अशा विविध प्रकारात सहभाग घेतला. स्पर्धेची सुरुवात नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते फ्लग मार्च आणि क्रीडा ज्योत पेटवुन तसेच हवेत बलुन सोडुन करण्यात आली. याप्रसंगी सहायक आयुक्त…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे बालिका दिनानिमित्त चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ आणि आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विधी सेवा शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एन.के.वाळके होते. सर्वप्रथम सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक आर.एस.पोतदार यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ विषयावर मराठीत कविता सादर केली. तालुका वकील संघाच्या सदस्या ॲड. योगिता पाटील यांनी ‘स्त्री भ्रूण हत्त्येच्या धोक्याची दुष्कृत्याला आळा घालण्यासाठी कडक कायदेशीर तरतुदी’…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कलागुण जोपासले जावेत. तसेच शिक्षणाबरोबरच त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रजासत्ताक दिनी जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम आत्मारामनंद महाराज वृंदावन धाम (मंगेश महाराज नाचणखेडा) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यासोबतच तंबाखूमुक्त व कुष्ठरोग निवारण करण्यासंदर्भात शपथ घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील दिनेश कुऱ्हाडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विलास पाटील ढालगाव, डब्ल्यू. एस. पाटील, रघुनाथ पाटील, सरपंच शारदा पाटील, उपसरपंच सुपडू कोळी, रवी सूर्यवंशी उपस्थित होते. गावातील पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आत्माराम पाटील तसेच वायरमन सुनील पाटील यांना उत्कृष्ट कामगिरी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनियर कॉलेज येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमळनेर येथील उद्योगपती तथा ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे महाव्यवस्था प्रमुख बजरंग अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. ध्वजारोहणानंतर आर्मी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. नंतर इयत्ता आठवीचे विद्यार्थी देवेंद्र पाटील आणि ग्रुप यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सम्राट मोरे याने मनोगत व्यक्त केले. आयुष्य पाडवी याने देशभक्तीपर गीताचे गायन केले. यावेळी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारे हजरत पिर मुसा कादरी बाबा यांचा उर्स निमित्त शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी आ.मंगेश चव्हाण यांनी बाबाच्या दर्गावर चादर अर्पण केली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील, राजेशाही मसालाचे संचालक हाजी गणी शेख, अमोल पाटील, रोहन पाटील, नगरसेवक फकिरा मिर्झा, बंडू पगार, हाजी मंजूर खान, सागर चौधरी, भाजपाचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अग्गा सय्यद उपस्थित होते.
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी अमळनेर येथे पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझल कट्ट्यासाठी मलकापूर येथील गझलकार सुरेश तायडे ह्यांच्या गझलची निवड झाली असल्याचे साहित्य महामंडळाकडून कळविण्यात आले आहे. येत्या ४ फेब्रुवारीला अमळनेर येथे त्यांच्या गझलेचे सादरीकरण होणार आहे. ह्यापूर्वी त्यांनी नाशिक, उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलेचे आणि कवितेचे सादरीकरण केलेले आहे. त्यांचा ‘भाकरी कवितेतली’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. सामाजिक आशय असलेल्या त्यांच्या कविता आणि गझल विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. ईश्वर एस. पाटील यांची राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण विकसन समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावर आधारित केंद्राचा अभ्यासक्रम आराखडा तयार झालेला असतो. त्यानुसार राज्यातील सद्यस्थिती आणि आव्हानांचा विचार करून राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करायचा असतो. ही निवड प्रक्रिया जवळपास दीड वर्षांपासून सुरू होती. सुरुवातीला काही टप्पे ऑनलाईन स्वरूपात झाले. त्यासाठी शेवटची मुलाखत ही ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रत्यक्षात घेण्यात आली. निवड प्रक्रियेत महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सेवेत असलेले आणि निवृत्त झालेले असे शिक्षक,…