नांद्रा प्र.लो. जि.प.शाळेत प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम

0
3

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कलागुण जोपासले जावेत. तसेच शिक्षणाबरोबरच त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रजासत्ताक दिनी जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम आत्मारामनंद महाराज वृंदावन धाम (मंगेश महाराज नाचणखेडा) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यासोबतच तंबाखूमुक्त व कुष्ठरोग निवारण करण्यासंदर्भात शपथ घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील दिनेश कुऱ्हाडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विलास पाटील ढालगाव, डब्ल्यू. एस. पाटील, रघुनाथ पाटील, सरपंच शारदा पाटील, उपसरपंच सुपडू कोळी, रवी सूर्यवंशी उपस्थित होते.

गावातील पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आत्माराम पाटील तसेच वायरमन सुनील पाटील यांना उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल गावाच्यावतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर जि.प.शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच आत्मारामनंद महाराज यांनी तरुणांनी चांगल्या कामासाठी पुढे यावे, असे आव्हान केले. त्यानंतर नाचणखेडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले.

कोरिओग्राफर नसतानाही मुलांनी अतिशय उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्याबद्दल मुख्याध्यापिका मेघा जावरे, रतिलाल भामरे, दिलीप ठाकूर यांचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी दिवाकर पाटील, अविनाश वाघ, देवदत्त पाटील, डॉ.दीपक पाटील, रोहन पाटील सार्वे तसेच विद्यार्थी पालक यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन मेघा जावरे तर आभार डॉ.संदीप पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here