लोहारातील गौरी पालीवाल, रूपाली कोळी यांचा गौरव

0
3

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गौरी श्‍याम पालीवाल आणि रूपाली ईश्‍वर कोळी हिने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव जिल्हा अंतर्गत नुकत्याच घेतलेल्या परीक्षेत सुयश मिळविले आहे. याबद्दल त्यांचा कस्तुरबा सभागृह गांधी तीर्थ, जैन हिल्स, शिरसोली रोड, जळगाव येथे शनिवारी, २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला. विद्यार्थिनींना कार्यक्रमात प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. त्यात मार्गदर्शन करणाऱ्या विद्यार्थिनींचे पालक श्‍याम पालीवाल, ईश्‍वर कोळी यांच्यासह शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थिनींचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापक यू.डी.शेळके, पर्यवेक्षक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड, व्हा.चेअरमन भीमराव शेळके, संस्थेचे सचिव सागरमल जैन, सहसचिव यू.यू.पाटील, दीपक गरुड यांच्यासह सर्व संचालकांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here