अमळनेरला आर्मी स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनियर कॉलेज येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमळनेर येथील उद्योगपती तथा ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे महाव्यवस्था प्रमुख बजरंग अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. ध्वजारोहणानंतर आर्मी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. नंतर इयत्ता आठवीचे विद्यार्थी देवेंद्र पाटील आणि ग्रुप यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सम्राट मोरे याने मनोगत व्यक्त केले. आयुष्य पाडवी याने देशभक्तीपर गीताचे गायन केले.

यावेळी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.पी.चौधरी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के.बी.बाविस्कर, प्रा. गिरीश पाटील, उपप्राचार्य प्रा. साळुंखे, कृषी तंत्र निकेतन प्राचार्य सुधीर पाटील, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी के.वाय.देवरे, डॉ. जे.एन.चव्हाण, श्रीमती प्रा. यु. बी.पाटील, प्रा. एन.के.वाणी तसेच सर्व युनिटचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थिनी, शिक्षिका सर्व युनिटचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक व्ही.जी.बोरसे, आर.ए.घुगे यांनी परिश्रम घेतले. तसेच एस.एम.महाले, व्ही. डी.पाटील यांनी सहकार्य केले. पाहुण्यांचा परिचय प्राजक्ता शिंदे यांनी केला. सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील तर आभार अनिल पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here