मराठा आरक्षण मिळाल्याने चोपड्यात जल्लोष

0
13

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळाल्याने मराठा बांधवांकडून चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले. तसेच फटाके फोडत पेढे वाटप करून शनिवारी सायंकाळी जल्लोष व्यक्त करुन आनंद साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी चौकातून विजयी रॅली काढण्यात येऊन मेन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.

मराठा आरक्षण लढ्याचे मुख्य मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाला न्याय दिला आहेे. याबद्दल मराठा समाजाच्या बांधवांतर्फे विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत राजेंद्र पाटील, प्रमोद बोरसे पाटील, मंगेश भोईटे, दिनेश बोरसे, भटू पाटील, विकास शिर्के, किशोर चौधरी, नंदकिशोर सोनवणे, रणजित निकम, डॉ. रवींद्र निकम, एकनाथ पाटील, जगदीश पवार, अभिजित देशमुख, नितीन निकम, नितीन पाटील, संजय पाटील, अशोक साळुंखे, प्रा.संदीप पाटील, रवींद्र मराठे, समाधान पाटील, जे.पी.पाटील, गुलाब पाटील, अजय राजपूत, किरण पाटील, पंकज शिंदे, बाबा देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here