चाळीसगावला मुलींच्या हायस्कुलला विधी सेवा शिबीर

0
10

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे बालिका दिनानिमित्त चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ आणि आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विधी सेवा शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एन.के.वाळके होते. सर्वप्रथम सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक आर.एस.पोतदार यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ विषयावर मराठीत कविता सादर केली. तालुका वकील संघाच्या सदस्या ॲड. योगिता पाटील यांनी ‘स्त्री भ्रूण हत्त्येच्या धोक्याची दुष्कृत्याला आळा घालण्यासाठी कडक कायदेशीर तरतुदी’ विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तालुका वकील संघाच्या उपाध्यक्षा ॲड. सुलभा शेळके यांनी ‘बालिका दिवस’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच न्या.एन.के.वाळके यांनी अध्यक्षीय भाषणात ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ’ विषयावर मार्गदर्शन करुन विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. यावेळी मुलींना पेनचे वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत मुलींना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

शिबिरात ज्येष्ठ विधिज्ञ तथा आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कुलचे संचालक प्रदीपराव अहिरराव, पर्यवेक्षक व्ही. ए. शिंगाडे, तालुका वकील संघाचे सदस्य ॲड. एन.एम.पाटील, ॲड. कविता जाधव यांच्यासह शिक्षक, सेवक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुका विधीसेवा समितीतर्फे वरिष्ठ लिपीक डी.के.पवार, शिपाई तुषार भावसार यांनी काम पाहिले. प्रास्ताविक तथा सुत्रसंचालन शिक्षिका सविता निकम तर शिक्षक विजय देवरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here