रायपुरातील मयुरेश्‍वर स्कुलमध्ये ज्येष्ठ नागरिकाला ध्वजारोहणाचा मान

0
3

साईमत, रायपूर, ता.जळगाव : वार्ताहर

येथील मयुरेश्‍वर इंग्लिश मीडियम स्कुल येथे शुक्रवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दरवर्षाप्रमाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच वसंत धनगर यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो मान गावातील ज्येष्ठ नागरिक भीमसिंग परदेशी (योगेश परदेशी ठाणे, मुंबई यांचे वडील) यांना देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी मानसिंग परदेशी (माजी उपसरपंच), प्रवीण परदेशी (प्र. माजी उपसरपंच), सीताराम परदेशी, संदीप परदेशी, भीमा धनगर, जयसिंग परदेशी (मयुरेश्‍वर स्कुलचे सचिव), गजेंद्रसिंग परदेशी (अध्यक्ष) तसेच सर्व पालक उपस्थित होते.

यावेळी भारतभूमीसाठी बलिदान देणाऱ्या शहिद जवान यांना वसंत धनगर यांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करुन अमर जवान स्मारकाच्या प्रतिकृतीसमोर ज्योत प्रज्ज्वलीत करण्यात आली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बेसिक आर्मी ट्रेनिंग प्रदर्शन सादर केले. याबद्दल उपस्थित मान्यवर, पालकांसह ग्रामस्थांनी चिमुकल्यांचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी सोनाली देसले, मयुरी मोरे, नम्रता बाविस्कर, भावना मोरे यांनी परिश्रम घेतले. आभार मुख्याध्यापिका भारती परदेशी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here