Author: Sharad Bhalerao

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचालनालय महाराष्ट्र राज्य शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट २०२३ -२४ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात सलग १७ व्यावर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. याबद्दल विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील ‘ए’ ग्रेडमध्ये तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात जान्हवी सचिन बावस्कर, गायत्री अरविंद बोडखे, जान्हवी प्रमोद दातीर तसेच ‘बी’ ग्रेडमध्ये सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात प्रतीक्षा योगेश चौधरी, अमृता शंकर खाटीक, अश्‍विनी यशवंत मोरे, हेमंत राजेंद्र निंबाळकर, नंदिनी प्रमोद सोनवणे, सानिया सत्तार तडवी यांचा समावेश आहे. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ‘ए’ ग्रेडमध्ये सहा…

Read More

साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालयातील टी.वाय.बी.कॉम.ची विद्यार्थिनी गायत्री सुकलाल पाटील हिला महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह चॅलेंज स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरावरील नाविन्यपूर्ण पारितोषिक प्राप्त झालेले आहे. स्पर्धेत उद्योग सुरू करण्यासाठी विजेत्यांना एक लाख रुपयाचे बीज भांडवल दिले जाणार आहे. त्यामुळे गायत्रीची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. वयस्कर लोकांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका व्हावी व त्यांना योग्य त्या सेवा सुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी विद्यार्थिनींनी काठी बनविलेली आहे. अशा नावीन्यपूर्ण काठीसाठीच पारितोषिक प्राप्त झालेले आहे. अशा उपक्रमात तिला रंजना सुनील कुमावत हिचे सहकार्य लाभले. तसेच मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.योगिता चौधरी यांनी काम पाहिले. यशासाठी गेल्या २६ जानेवारी…

Read More

साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर येथील नगरपंचायतीच्या प्रशासनाने मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी नगरपंचायततर्फे ‘स्वच्छ भारत व माझी वसुंधरा’ अभियाना अंतर्गत मुख्याधिकारी तथा प्रशासक साजिद पिंजारी, माजी नगराध्यक्षा विजया खलसे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक नगरसेविका, ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे यांच्या उपस्थितीत पथनाट्य कलावंतांद्वारे पुष्पगुच्छने सत्कार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, वाडी दरवाजा येथे जनजागृती करण्यासाठी पथनाट्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पथनाट्याच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जामनेर येथील लोकरंजन बहुउद्देशीय संस्था यांनी अभियानात प्लास्टिक वापर व दुष्परिणाम, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियानाबाबत विशेष जनजागृती केली. ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यातून उत्पन्न घेणे यांसारख्या…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील जे.टी.महाजन सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये गुरुवारी, 8 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलनात वेगवेगळ्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, कोळीनृत्य, भांगडा अशा विविध नृत्यप्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भालोद येथील मेडिकल ऑफिसर डॉ. फिरोज तडवी उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक उल्हास चौधरी, सुहास महाजन, नितीन महाजन, प्रभाकर सोनवणे, डॉ.निलेश गडे, प्राचार्या रंजना महाजन, प्राचार्य डॉ.किरण खेट्टे, आय.टी.आय.चे प्राचार्य गिरीश वाघुळदे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मोदी आवास घरकुलाच्या लाभार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पैसे मागणी केली जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांनी शुक्रवारी, ९ फेब्रुवारी रोजी दुपारी गटविकास अधिकारी निशा जाधव यांची भेट घेत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. जोपर्यंत कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही. तसेच कार्यकर्त्यांसह येथेच पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा खडसे यांनी घेतला होता. मुक्ताईनगर तालुक्यातील मोदी आवास घरकुलांच्या संदर्भात लाभार्थींनी रोहिणी खडसे यांच्याकडे तक्रार केलेली होती. त्यानुसार दुपारी ॲड.खडसे यांनी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी निशा जाधव यांच्या दालनात जाऊन लाभार्थ्यांसहित भेट घेत…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथे बुधवारी, ७ रोजी रात्री मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर कुंभारवाड्यातील काही जणांनी मिरवणुकीतील सहभागी तरुणाने महापुरुषांच्या पोस्टरची विटंबना केल्याचा आरोप केल्यामुळे दोन गटात मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी रात्री सहा संशयितांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुवारी सकाळी एका गटातील महिला व पुरुषांनी पोलीस ठाण्यात जाऊन आपले म्हणणे मांडले तर दुसऱ्या गटाने देगाव पोलीस चौकीसमोर उपोषण सुरू करून वाहनांचे टायर पेटवून गावबंदची घोषणा दिली. याप्रकरणी ८ रोजी रात्री उशिरापर्यंत एका गटाकडून सहा तर पोलिसांकडून ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दहिगाव येथील मुख्य चौकात रस्ता अडवून बसलेल्या नागरिकांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील सानेगुरुजी विद्या मंदिरात लेखिका दर्शना पवार लिखित ‘लढणाऱ्यांचे बळ रमाई’ पुस्तकाचे प्रकाशन रमाई जयंतीनिमित्त विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थिनींना रमाई पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. रमाई जयंतीनिमित्त साने गुरुजी विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये चेतश्री प्रकाशन संस्थेचे प्रकाशक चेतन सोनार, विद्रोही साहित्य संमेलनाचे निमंत्रक रणजीत शिंदे आणि युवा नाट्य कलावंत भूमिका घोरपडे यांच्या हस्ते रमाई पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रमाई जयंतीनिमित्त श्रीमती प्रतिभा प्रकाश शिदिड यांच्या दातृत्वातून पुस्तकाचे वितरण साने गुरुजी विद्यालय अमळनेर, मंगरूळ हायस्कूल व रणाईचे आश्रमशाळा तसेच रमाई ढोल पथकाच्या विद्यार्थिनीं व महिलांना मोफत करण्यात आले. सानेगुरुजी विद्यालय येथे प्रास्ताविकात…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी हिरापूर रस्त्याला स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे, अशा आशयाची मागणी चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी हिरापूर रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते. चाळीसगाव शहरातून जळगाव, चांदवड हायवे रस्ता गेलेला आहे. हिरापूर मोरी ते गणेश मंगल कार्यालय पर्यंतचा रस्ता चाळीसगाव नगरपरिषदेच्या हद्दीत आहे. चाळीसगाव नगरपरिषद हद्दीत असलेला रस्ता हा दोन पदरी आहे. हायवे रस्ता हा चार पदरी असा आहे. त्यामुळे वाहनधारकांना येताना चार पदरी रस्त्याने यावे लागते. हायवे रस्ता संपल्यानंतर चाळीसगाव नगरपरिषद दोन पदरी रस्ता लागतो. चाळीसगाव नगरपरिषद हद्दीतील म्हणजे गणेश मंगल कार्यालय ते हिरापूर मोरी भागात रस्त्यावर बरेचसे अपघात आतापर्यंत झाले आहेत.…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी जलजीवन मिशन योजना सामन्यांचे जीवन सुकर करणारी आणि जनतेला वरदान ठरणारी आहे. लहान मोठे पुलांचे काम करून रस्त्यांचे जाळे विणले आहे. त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार गोरगरीबांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. हनुमंतखेडा येथे उर्वरित रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवून १०० टक्के पेव्हिंगचे गाव करणार असल्याची ग्वाही दिली. ‘सिझनेबल’ पुढाऱ्यांना जनता थारा देत नसून जनता त्यांचा ‘टांगा पलटी घोडे फरार’ कधी करेल सांगता येत नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हनुमंतखेडा येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले.…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी येथील धनाजी नाना महाविद्यालयातील दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीचा विद्यार्थी महेंद्र भोई याची भारतीय नौदलात स्किल टेक्निशियन म्हणून निवड झाली आहे. याबद्दल त्याचा प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. रावेर तालुक्यातील गाते येथील मधुकर विठ्ठल भोई व आई यशोदाबाई यांचा महेंद्र हा चिरंजीव आहे. आई वडिलांची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे, कामाला जावे लागत होते. म्हणून तीन वेळा १२ वी नापास होऊन चौथ्या वर्षी पास झाल्यावर पुढे काय करावे सुचत नव्हते. बी.ए.ला धनाजी नाना महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर कळले की, येथे दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनी आहे. त्यात असंख्य मुले रोज अभ्यास करतात. हे एक उत्तम…

Read More