साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
हिरापूर रस्त्याला स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे, अशा आशयाची मागणी चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी हिरापूर रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते.
चाळीसगाव शहरातून जळगाव, चांदवड हायवे रस्ता गेलेला आहे. हिरापूर मोरी ते गणेश मंगल कार्यालय पर्यंतचा रस्ता चाळीसगाव नगरपरिषदेच्या हद्दीत आहे. चाळीसगाव नगरपरिषद हद्दीत असलेला रस्ता हा दोन पदरी आहे. हायवे रस्ता हा चार पदरी असा आहे. त्यामुळे वाहनधारकांना येताना चार पदरी रस्त्याने यावे लागते. हायवे रस्ता संपल्यानंतर चाळीसगाव नगरपरिषद दोन पदरी रस्ता लागतो. चाळीसगाव नगरपरिषद हद्दीतील म्हणजे गणेश मंगल कार्यालय ते हिरापूर मोरी भागात रस्त्यावर बरेचसे अपघात आतापर्यंत झाले आहेत. अपघातात दोन ते तीन लोकांचा प्राण गेला आहे. रस्त्यावर नेहमी छोटे-मोठे अपघात रोजच घडत आहे. चाळीसगाव नगर परिषदेने गणेश मंगल कार्यालयाजवळ तसेच सिदाजी आप्पा मंदिराजवळ स्पीड ब्रेकर बसवावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, चाळीसगावचे शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, चाळीसगावचे तालुका उपाध्यक्ष कैलास देशमुख, अशोक भोसले, समर्थ भोसले, सामाजिक कार्यकर्ते किरण आढाव, कुणाल कुमावत, आप्पा देवरे, अतुल गायके, प्रशांत ठाकूर, सचिन आव्हाड, केतन चव्हाण, रणजित पवार, विनोद जैन, सिद्धार्थ राजपूत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.