शेंदुर्णीतील गरुड महाविद्यालयाच्या गायत्री पाटीलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

0
3

साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर

येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालयातील टी.वाय.बी.कॉम.ची विद्यार्थिनी गायत्री सुकलाल पाटील हिला महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह चॅलेंज स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरावरील नाविन्यपूर्ण पारितोषिक प्राप्त झालेले आहे. स्पर्धेत उद्योग सुरू करण्यासाठी विजेत्यांना एक लाख रुपयाचे बीज भांडवल दिले जाणार आहे. त्यामुळे गायत्रीची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

वयस्कर लोकांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका व्हावी व त्यांना योग्य त्या सेवा सुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी विद्यार्थिनींनी काठी बनविलेली आहे. अशा नावीन्यपूर्ण काठीसाठीच पारितोषिक प्राप्त झालेले आहे. अशा उपक्रमात तिला रंजना सुनील कुमावत हिचे सहकार्य लाभले. तसेच मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.योगिता चौधरी यांनी काम पाहिले. यशासाठी गेल्या २६ जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्याकडून विजेत्यांचा जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातर्फे गायत्री आणि मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सचिव सागरमल जैन, सहसचिव उत्तम पाटील, दीपक गरुड, प्राचार्य प्रा.याम साळुंखे यांच्यासह सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here