जे.टी.महाजन सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

येथील जे.टी.महाजन सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये गुरुवारी, 8 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलनात वेगवेगळ्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, कोळीनृत्य, भांगडा अशा विविध नृत्यप्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भालोद येथील मेडिकल ऑफिसर डॉ. फिरोज तडवी उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक उल्हास चौधरी, सुहास महाजन, नितीन महाजन, प्रभाकर सोनवणे, डॉ.निलेश गडे, प्राचार्या रंजना महाजन, प्राचार्य डॉ.किरण खेट्टे, आय.टी.आय.चे प्राचार्य गिरीश वाघुळदे उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्या रंजना महाजन, प्राचार्य डॉ. किरण खेट्टे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आय.टी.आय.चे सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रशांत तळेले, प्रीती भार्गव तर आभार प्रेरणा भंगाळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here