शेंदुर्णीला नगरपंचायततर्फे जनजागृतीसाठी पथनाट्याचा कार्यक्रम

0
1

साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर

येथील नगरपंचायतीच्या प्रशासनाने मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी नगरपंचायततर्फे ‘स्वच्छ भारत व माझी वसुंधरा’ अभियाना अंतर्गत मुख्याधिकारी तथा प्रशासक साजिद पिंजारी, माजी नगराध्यक्षा विजया खलसे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक नगरसेविका, ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे यांच्या उपस्थितीत पथनाट्य कलावंतांद्वारे पुष्पगुच्छने सत्कार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, वाडी दरवाजा येथे जनजागृती करण्यासाठी पथनाट्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पथनाट्याच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी जामनेर येथील लोकरंजन बहुउद्देशीय संस्था यांनी अभियानात प्लास्टिक वापर व दुष्परिणाम, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियानाबाबत विशेष जनजागृती केली. ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यातून उत्पन्न घेणे यांसारख्या उपक्रमांबद्दल जनजागृती करून शहरातील जनतेला स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. लोकरंजन बहुउद्देशीय संस्थेचे संतोष सराफ त्यांचे सहकारी शिवाजी डोंगरे, माधव सुरवाडे, हरी लोहार, मीना शिंदे, मिठीराम जोगी ह्या कलावंतांनी पथनाट्य सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here