साईमत, अमळनेर : प्रतिनिधी मुला-मुलींसाठी वस्तीगृह, मोफत वाचनालय, बाल संस्कार केंद्र, समुपदेशन केंद्र आणि वधु-वर सूचक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय तालुका मराठा समाजातर्फे वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील होते. प्रास्ताविकात सचिव विक्रांत पाटील यांनी मराठा समाजाच्या उत्पन्नात ७९ लाख ५० हजार ५१४ रुपयांची वाढ होऊन १ कोटी ६ लाख रुपयांची वार्षिक आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगितले. सभेत मराठा समाज संचालक मंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच आ.मंगेश चव्हाण आणि शिवाजी शिंदे यांचा गौरव करण्याचा ठरावही मांडण्यात आला. सभेत मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण बकाले यांचा निषेध करण्यात आला. संस्थेचे कायमस्वरूपी…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील गुड शेफर्ड अकॅडमी स्कुलमधील इयत्ता नववी (अ) ची विद्यार्थिनी हिमानी प्रशांत भालेराव ही चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत राज्यातून ६१ वी आली आहे. तिला चाळीसगाव तालुक्यातील ए.बी.हायस्कुल केंद्रातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच इंटरमिजिएट परीक्षेत ‘ए’ ग्रेड प्राप्त झाला आहे. तिला कलाशिक्षक योगेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. ती संजय भालेराव (इंटेरिअर डिझायनर, पुणे) यांची पुतणी आहे. ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक आगळावेगळा आदर्श घेऊन कलाक्षेत्रात यश संपादन करीत आहे. हिमानीच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डॅनियल दाखले, कलाशिक्षक सी.के.सोनवणे, सर्व शिक्षक, ‘किमया’ गु्रपने कौतुक केले आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी भडगाव रस्त्यावरील दत्त मंदिरासमोर रस्त्याच्या अर्ध्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या ट्रॅव्हल्स धारकांवर कारवाई करुन अन्य ठिकाणी पार्किंग करावी, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे एपीआय ढिकले यांना बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव शहरातून जळगाव-चांदवड हायवे रस्ता गेलेला आहे. हायवे रस्त्यावर भडगाव रोड दत्त मंदिरासमोर रोडच्या अर्ध्या भागात पुणे, सुरत, मुंबई जाणाऱ्या ट्रॅव्हल्स रात्री ८ वाजेपासून उभ्या असतात. त्यामुळे चाळीसगाव शहरातील नागरिकांना जाण्या-येण्यास मोठी कसरत करावी लागते. याठिकाणी अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचा मोठा रोष निर्माण झाला आहे. भविष्यात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या अर्ध्या भागात…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी जळगाव येथील पवन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ (मुंबई) तसेच युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक कै. पुरुषोत्तम नारखेडे उर्फ मालतीकांत यांच्या स्मरणार्थ सतराव्या बहिणाबाई व सोपानदेव खान्देश साहित्य व कवी संमेलन जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात पाच सत्रात नुकतेच घेण्यात आले. अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे होतेे. संमेलनाचे परिसंवाद, कथाकथन, मराठी भाषा, कवी संमेलन व पुरस्कार वितरण आणि समारोप असे स्वरूप होते. संमेलनात आदर्श शिक्षक आणि आदर्श समाजसेवक यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यात पाचोरा येथील पत्रकार तथा कवी प्रा. शिवाजी शिंदे यांना संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथे बुधवारी, २१ फेब्रुवारी २०२४ यादिवशी सकल हिंदू समाजाच्यावतीने होणाऱ्या हिंदू राष्ट्रजागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती. ‘तेलंगणाचे भाजपाचे आमदार तथा प्रखर हिंदुत्ववादी श्री. टी. राजासिंह हे प्रक्षोभक आणि द्वेषमूलक वक्तव्य करतात’, हे कारण देत पोलिसांनी अनुमती नाकारली होती. सभेची अनुमती घेण्यासाठी सकल हिंदू समाजाने २५ जानेवारी यादिवशी म्हणजे सभेच्या २५ दिवस आधीच पोलिसांकडे निवेदन दिले होते. परंतु पोलिसांनी सभेच्या दोन दिवसाआधी तीन सार्वजनिक सुट्ट्या बघून अनुमती नाकारली. याविषयी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने अनिल वानखेडे आणि राजाराम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात फौजदारी ‘रिट याचिका’ प्रविष्ट केली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने चोपड्यात…
साईमत, यावल : प्रतिनिधी ‘यावल नगरपालिका ठेकेदारीत मजुरांच्या टाळूवरील लोणी खाणारी यंत्रणा कार्यरत… मुख्याधिकाऱ्यांसह सहाय्यक आयुक्तांना द्यावी लागते टक्केवारी..?’ असे वृत्त दैनिक ‘साईमत’मध्ये १७ फेब्रुवारी २०२४ रोजी ठळक मथळ्याखाली प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर ठेकेदारांमार्फत कामावरील असलेल्या मजुरांनी प्रसिद्धी माध्यमास माहिती दिल्याचा संशय घेत यावल नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदाराने संबंधित काही मजुरांना कामावरून बंद करून टाकण्याची धमकी देत ‘तुम्हाला उपाशी मारू’ यापुढे प्रसिद्धी माध्यमांना माहिती देऊ नका आणि माहिती कोणी दिली ‘त्याचा तपास करून सांगा’ असे दबावतंत्र वापरले जात आहे. त्यामुळे आता याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. यावल नगरपालिकेत विविध ठिकाणी…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांअंतर्गत समाजातील अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्या, निराधार व्यक्तींना चरितार्थ चालविण्यासाठी आधार म्हणून शासनातर्फे दरमहा मानधन (वेतन) दिले जाते. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून योजनांच्या लाभार्थ्यांना मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर चरितार्थ कसा चालवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही कैफियत लाभार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे मांडली. त्यावर त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि योजनांच्या लाभार्थ्यांना…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी संघटनेचे कुठलेही कार्य संघटनेतील एकता आणि सार्वमताच्या प्राधान्यावर अवलंबून असते. त्यासाठी ध्येय निश्चिती करा. कुठल्याही कार्यात निस्वार्थीपणे स्वतःला झोकून द्या तरच ध्येय निश्चिती साध्य होईल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्या.संगीतराव पाटील यांनी केले. हे सांगताना त्यांनी काही उदाहरणे दिली. समृद्धी शिक्षक फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त बोधचिन्हाचा अनावरण सोहळा मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या.तथा नंदुरबार सरदार सरोवर प्रकल्प तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष संगीतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतातून बोलत होते. त्यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक जामराव पाटील यांनी केला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला न्या.संगीतराव पाटील यांनी माल्यार्पण केले. यावेळी बोधचिन्ह ज्यांनी तयार केले ते संस्थापक सचिव,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. शासकीय विश्रामगृहात उत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल जाधव, अध्यक्ष किरण जाधव, प्रसिद्धी प्रमुख राजेश राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. डिजेच्या तालावर नाचत स्टेशन रोड, आठवडे बाजार, पाचपावली, बस स्टँड मार्गे भव्य शोभायात्रा काढण्यात येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत यात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेत तालुक्यातील सर्व बंजारा समाज बांधव परिवारासह तसेच महिला पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. मिरवणुकीसाठी एकनाथ जाधव, चंदू जाधव, राहुल चव्हाण, रणजीत राठोड, राजेश राठोड, राम पवार, प्रकाश…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि फैजपूर तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आत्मनिर्भर युवती’ अभियानाचा यशस्वी समारोप नुकताच करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.पी.डी.पाटील होते. सहा दिवस घेण्यात आलेल्या अभियानात ७५ विद्यार्थिनींचा सहभाग होता. अभियानाचे उद्घाटन १२ फेब्रुवारीला झाले होते. उद्घाटक म्हणून यावलच्या सरकारी वकील सुल्ताना तडवी यांनी महिलांसाठी विविध कायद्यांची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी अनिल हेडाऊ (शाखा व्यवस्थापक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, भुसावळ) यांनी राष्ट्रीयकृत बँकेत महिलांसाठी विविध योजनांची माहिती दिली. तिसऱ्या दिवशी…