खान्देश संमेलनात शिवाजी शिंदे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

0
2

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

जळगाव येथील पवन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ (मुंबई) तसेच युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक कै. पुरुषोत्तम नारखेडे उर्फ मालतीकांत यांच्या स्मरणार्थ सतराव्या बहिणाबाई व सोपानदेव खान्देश साहित्य व कवी संमेलन जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात पाच सत्रात नुकतेच घेण्यात आले. अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे होतेे. संमेलनाचे परिसंवाद, कथाकथन, मराठी भाषा, कवी संमेलन व पुरस्कार वितरण आणि समारोप असे स्वरूप होते. संमेलनात आदर्श शिक्षक आणि आदर्श समाजसेवक यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यात पाचोरा येथील पत्रकार तथा कवी प्रा. शिवाजी शिंदे यांना संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

याप्रसंगी स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे, कथाकार राहुल निकम, विलास मोरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष विजय लुल्हे उपस्थित होते.संमेलनाचे उद्घाटन धनंजय गुडसुरकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संध्या महाजन, सूत्रसंचालन पत्रकार तुषार वाघुळदे आणि कवयित्री ज्योती राणे तर कवी संजय पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here