साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. शासकीय विश्रामगृहात उत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल जाधव, अध्यक्ष किरण जाधव, प्रसिद्धी प्रमुख राजेश राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. डिजेच्या तालावर नाचत स्टेशन रोड, आठवडे बाजार, पाचपावली, बस स्टँड मार्गे भव्य शोभायात्रा काढण्यात येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत यात्रेचा समारोप करण्यात आला.
शोभायात्रेत तालुक्यातील सर्व बंजारा समाज बांधव परिवारासह तसेच महिला पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. मिरवणुकीसाठी एकनाथ जाधव, चंदू जाधव, राहुल चव्हाण, रणजीत राठोड, राजेश राठोड, राम पवार, प्रकाश पवार, किशोर पवार, नरेंद्र राठोड, ज्ञानेश्वर राठोड, संदीप पवार, विनोद जाधव, ईश्वर राठोड, सुभाष चव्हाण, प्रकाश राठोड यांच्यासह हजारो बंजारा समाज बांधव उपस्थित होते.