अमळनेरला तालुका मराठा समाजातर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

मुला-मुलींसाठी वस्तीगृह, मोफत वाचनालय, बाल संस्कार केंद्र, समुपदेशन केंद्र आणि वधु-वर सूचक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय तालुका मराठा समाजातर्फे वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील होते.
प्रास्ताविकात सचिव विक्रांत पाटील यांनी मराठा समाजाच्या उत्पन्नात ७९ लाख ५० हजार ५१४ रुपयांची वाढ होऊन १ कोटी ६ लाख रुपयांची वार्षिक आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगितले.

सभेत मराठा समाज संचालक मंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच आ.मंगेश चव्हाण आणि शिवाजी शिंदे यांचा गौरव करण्याचा ठरावही मांडण्यात आला. सभेत मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण बकाले यांचा निषेध करण्यात आला. संस्थेचे कायमस्वरूपी स्टेज, भोजन टेबल, नवीन डोम, मराठा समाज महिला मंडळ, युवक मंडळ स्थापन करून कार्यालय भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सभेत उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, सचिव विक्रांत पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, संचालक संजय पाटील, शिवाजी पाटील, संजीव पाटील, चंद्रकांत काटे, प्रवीण पाटील, जयप्रकाश पाटील, गौरव पाटील, दिलीप पाटील, राजश्री पाटील, डॉ.वंदना पाटील, तिलोत्तमा पाटील, प्रबोधिनी पाटील, प्रा.हिरालाल पवार, अशोक पाटील, श्‍याम पाटील, श्रीकांत पाटील, अनिल शिसोदे, दिनेश साळुंखे, सचिन वाघ, प्रवीण देशमुख, बाळा पवार, महेश पाटील, भास्कर बोरसे, किरण पाटील, शरद सोनवणे, ए.डी.पाटील, लक्ष्मण पवार यांनी चर्चेत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here