साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील पिंपळे रस्त्यावरील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचे बहारदार प्रदर्शनाने ‘सांस्कृतिक कला उत्सव २०२४’ नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव योगिता पाटील, बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, नितीन पाटील, भाईदास भील, शरद पाटील, गटसचिव संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार, चौबारी हायस्कुलचे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, मुख्याध्यापक आशिष पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील उच्चभ्रू वस्तीत गरजूंच्या मुलांना दर्जेदार…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला १० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ‘एक बार फिर से मोदी सरकार’ असा नारा देत रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर शहर येथे भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह खा.रक्षा खडसे यांनी विजय महाजन, रवींद्र राणे, अविनाश महाजन, निलेश शिरसाठ, मुकेश महल्ले, किशोर बोडदे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन ‘संपर्क से समर्थन’ आणि ‘घर चलो अभियान’ राबविले. ‘मोदी सरकार’मार्फत जनसामान्यांपासून तर विविध क्षेत्रात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला. तसेच माहिती पत्रकाचेही वाटप करण्यात आले. तसेच जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येऊन मोदी सरकारच्या कामकाजाविषयी वैयक्तिक अनुभव जाणून घेण्यात आले. ‘महाविजय…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १ ते ३ मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींचा विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा मंत्रघोष, स्तवनगीते, मंगलवाद्यासह भक्ती आणि चैतन्याची अनुभूती देत मंगलमय वातावरणात हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला. ३ रोजी संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते विविध मूर्तींचे विधिवत पूजन व मंत्रोपचारात लोकार्पण झाले. महासोहळ्याचे आपणही साक्षीदार व्हावे, ही सद्भावना ठेवून हजारो भाविकांनी सकाळपासूनच मंदिर परिसरात गर्दी केली होती. आजच्या पूर्णाहुती महासोहळ्याला गोदावरी फाउंडेशनचे डॉ. वैभव पाटील, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील आणि नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील आहेर…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला रविवारी, ३ मार्च रोजी उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी जामनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते हिंदवी मुळे या तीन वर्षाच्या बालिकेस पोलिओ लसीचा डोस पाजून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, व्ही.एच.माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.जयश्री पाटील, डॉ.कांचन पोटे, आशा कुयटे, बशीर पिंजारी, सोनल पाटील, अण्णा जाधव, गोपाळ पाटील, रवींद्र सूर्यवंशी, सुधाकर माळी, किशोर पाटील, संगीता पाटील, लता सुशिर उपस्थित होते. तालुक्यातील शहरी १९ आणि ग्रामीण २०७ बुथद्वारे ३५ हजार १९८ बालकांना पोलिओ लसीचा…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मंगरूळ येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कुलमध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘मरीयन मेगा एक्सपो’ विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. विज्ञानासोबतच इतिहास, भूगोल विषयातील मांडलेल्या उपकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. विज्ञान प्रदर्शनात ३०० विद्यार्थ्यांनी उपकरणांची मांडणी केली होती. विज्ञान प्रदर्शनाचे तालुका विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सैनिकी शाळा कृती समितीचे राज्य समन्वयक उमेश काटे, तालुका विज्ञान मंडळाच्या सदस्या डॉ.भाग्यश्री वानखडे, मुख्याध्यापिका सिस्टर जोईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर सिन्सी आदी उपस्थित होते. शाळेचा विद्यार्थी उज्ज्वल पाटील याने तयार केलेली विज्ञान दिनाची थीम सादर करून अनोख्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आकर्षक…
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.येथील श्री स्वामी समर्थ महिला शेतकरी गटाने पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२३’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून एक लाखाचे बक्षीसही मिळविले आहे. याबद्दल त्यांचा पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथील कार्यक्रमात अभिनेते आमिर खान, किरणराव तसेच पाणी फाउंडेशन चळवळीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. नांद्रा गावात दोन महिला गट आणि एक पुरुष गट असे तीन गट होते. तसेच ७८ गट स्पर्धेसाठी होते. गटाच्या माध्यमातून ‘गट शेती साक्षरता’ विषय राबविण्यात आला. गटाने एकत्रित येऊन कृषी निविष्ठांची खरेदी करून तसेच शेतातील कामे एकत्र येऊन करून पैशांची बचत होते. तसेच उत्पादन खर्च कमी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. विज्ञानासोबतच गणित, इतिहास, भूगोल विषयातील मांडलेल्या उपकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उपकरणांची मांडणी केली होती. विज्ञान प्रदर्शनाचे विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री भदाणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, डी.बी.वाल्हे, विज्ञान शिक्षक एन.बी.खंडारे, जी.पी.हडपे, उमेश काटे, दीपककुमार पाटील, नीलिमा पाटील आदी उपस्थित होते. प्रदर्शनात स्मार्ट सिटी, सेंद्रिय शेती, ज्वालामुखी, भूकंप लहरी, सूर्यमाला आदींसह विविध उपकरणांची मांडणी केली होती. शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनात आठवीची विद्यार्थिनी पल्लवी मोरे आणि…
साईमत, कजगाव, ता. भडगाव : वार्ताहर येथील रहिवासी तथा भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आसिफ शे.शफी मणियार यांची भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड केली आहे. सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आसिफ मणियार यांना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण यांनी निवडीबद्दल नियुक्तीपत्र दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खा.उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख अमोल शिंदे, तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, माजी उपसरपंच शफी मणियार, ग्रामपंचायत सदस्य सादिक मन्यार, पत्रकार अमीन पिंजारी आदींनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील हिरापूर रस्त्यावरील भास्कराचार्य इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल (सीबीएस पॅटर्न) येथे चिमुकल्यांनी बाल मेळाव्याचा आनंद घेतला. बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्यांनी विविध खाद्यपदार्थांची दुकाने लावली होती. त्यामुळे मेळाव्यात मोठी आर्थिक उलाढाल झाली. यावेळी शिक्षकांसह पालकांनी मुलांचे कौतुक करून खरेदीचा आनंद लुटला. बाल मेळाव्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञान समजण्यास मदत झाली. आपण व्यवसाय करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात आला. यावेळी बहुतांश पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पाच सर्वोत्कृष्ट चिमुकल्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. चाळीसगाव येथील अर्जंट मोबाईलचे संचालक, युवा उद्योजक, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते तनवीर भाई शेख यांची मुलगी भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कुल नेताजी चौक इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आलीना शेख तनवीर…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा २, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार अशा योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती होण्यासाठी जलरथाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या राज्य शासनाच्या योजनांविषयी जलरथाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. गेल्या शुक्रवारी, १ मार्च रोजी जामनेरात रथाचे आगमन झाले. यावेळी रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जामनेर तालुक्यात अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. तालुक्यातील ग्रामीण भागात लोकसहभागातून पाणी पुरवठ्यासह गावातील पाण्याचे स्त्रोत निर्माण करून बळकट करणे, या उद्देशाने पंचायत समितीच्या कार्यालयात माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते रथाची पूजा करून…