साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील हिरापूर रस्त्यावरील भास्कराचार्य इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल (सीबीएस पॅटर्न) येथे चिमुकल्यांनी बाल मेळाव्याचा आनंद घेतला. बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्यांनी विविध खाद्यपदार्थांची दुकाने लावली होती. त्यामुळे मेळाव्यात मोठी आर्थिक उलाढाल झाली. यावेळी शिक्षकांसह पालकांनी मुलांचे कौतुक करून खरेदीचा आनंद लुटला. बाल मेळाव्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञान समजण्यास मदत झाली. आपण व्यवसाय करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात आला. यावेळी बहुतांश पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पाच सर्वोत्कृष्ट चिमुकल्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
चाळीसगाव येथील अर्जंट मोबाईलचे संचालक, युवा उद्योजक, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते तनवीर भाई शेख यांची मुलगी भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कुल नेताजी चौक इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आलीना शेख तनवीर हिला घरी मेहनत करून स्वादिष्ट मेनू बनवून त्याची उत्कृष्ट विक्री केल्याबद्दल दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
आलीना शेख तनवीर हिला प्राचार्य श्रद्धा ठाकूर, उपप्राचार्य सीमा वर्मा, ॲड. रोहिणी देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्रासह पारितोषिक देण्यात आले.
आलीना शेख हिला मिळालेल्या यशात प्राचार्य श्रद्धा ठाकूर, श्रीमती मुस्कान, सोनवणे, सलमान, पंकज पवार, कविता शिंदे, कांचन मिश्रा, श्रीमती जयश्री, श्री.कुंदन यांच्यासह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. आलीनाला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.