भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी आसिफ मणियार

0
1

साईमत, कजगाव, ता. भडगाव : वार्ताहर

येथील रहिवासी तथा भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आसिफ शे.शफी मणियार यांची भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड केली आहे. सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आसिफ मणियार यांना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण यांनी निवडीबद्दल नियुक्तीपत्र दिले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खा.उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख अमोल शिंदे, तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, माजी उपसरपंच शफी मणियार, ग्रामपंचायत सदस्य सादिक मन्यार, पत्रकार अमीन पिंजारी आदींनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here