साईमत, जामनेर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा २, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार अशा योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती होण्यासाठी जलरथाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या राज्य शासनाच्या योजनांविषयी जलरथाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. गेल्या शुक्रवारी, १ मार्च रोजी जामनेरात रथाचे आगमन झाले. यावेळी रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जामनेर तालुक्यात अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. तालुक्यातील ग्रामीण भागात लोकसहभागातून पाणी पुरवठ्यासह गावातील पाण्याचे स्त्रोत निर्माण करून बळकट करणे, या उद्देशाने पंचायत समितीच्या कार्यालयात माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते रथाची पूजा करून व हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त अभियंता जे. के. चव्हाण, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पंचायत समितीचे माजी सभापती नवलसिंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजमल भागवत, उपसभापती वासुदेव घोंगडे, नगरपालिकेचे माजी गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, माजी नगरसेवक आतिष झाल्टे, दीपक तायडे, उल्हास पाटील, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, विस्तार अधिकारी अशोक पालवे, अनिल बोरसे, कैलास पालवे, विजय शिरसाठ, रामकिशन नाईक यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुमीत मुणोत, उपाध्यक्ष प्रफुल्ल लुंकड, अतुल कोठारी, नितीन सुराणा, सचिन चोपडा, मुकेश बोहरा, अमीत बेदमुथा, नरेंद्र राका, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



