Author: Sharad Bhalerao

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील संत मुक्ताबाई यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. भाविकांनी यात्रेचा मुख्य दिवस असलेल्या गुरुवारी, ७ मार्च रोजी भागवत एकादशीला सकाळपासून जुने मुक्ताई मंदिर (कोथळी), नवीन मुक्ताई मंदिर, मेहूण येथील मुक्ताई, चांगदेव येथील योगीराज चांगदेव महाराज मंदिर येथे गर्दी केली होती. यावेळी शेकडो दिंड्या मुक्ताईनगरमध्ये दाखल झाल्या आहेत. टाळ, मृदंगाच्या गजरात दाखल झालेल्या दिंड्यामुळे मुक्ताईनगर दुमदुमले होते. गुरुवारी पहाटेपासूनच १२५ दिंड्या मुक्ताईनगर येथे दाखल झाल्या आहेत. तसेच मुक्ताईनगर शहरात स्टॉल लावून ठिकठिकाणाहून येणाऱ्या वारकरी, भाविकांसाठी चहा, फराळाचे वाटप करण्यात आले. पाणपोईची व्यवस्था केली आहे. मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिरात केऱ्हाळा येथील मुरलीधर पाटील, नाचणखेडा येथील तरुण मित्र मंडळातर्फे फराळासह…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालय होणे सोपे नाही. आ. मंगेश चव्हाण कुठलेही काम हाती घेतल्यावर पूर्ण करतात. त्यामुळे ते तालुक्याचा विकास करीत आहेत. त्यांनी सतत पाठपुरावा करून कार्यालयाचे काम मंजूर करून आणले. त्यामुळेच दूरदृष्टी असलेला आमदार आणि नेता तालुक्याला लाभला आहे. ‘अशक्य’ हा शब्द आ.मंगेश चव्हाण यांना माहित नाही. त्यामुळेच आठवड्याभरात त्यांनी आरटीओ कार्यालय सुरु करून दाखविले, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या येथील महात्मा फुले कॉलनीतील शहीद हेमंत जोशी क्रीडांगण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नवीन वाहनांना एमएच ५२ नोंदणी शुभारंभासह विविध विकास कामांचे…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजक मलकापूर जैन महिला मंडळ संचालित भगवान महावीर निवासी मूकबधिर विद्यालय आणि मतिमंद बालक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धा 2024 आयोजित केल्या होत्या. स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचे उद्घाटन मलकापुरचे आ. राजेश एकडे यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, ॲड. एस. एस. मोरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे, तहसीलदार राहुल तायडे, समाज कल्याण विभागाचे एस.एम. पुंड, पुरुषोत्तम राठी, मनीष लखानी, सुभाष पाटील, श्री जैन महिला मंडळाच्या अध्यक्ष बसंतीदेवी…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून गोळा केलेल्या घनकचऱ्यावर लाखो रुपये खर्च करून ओला, सुका, प्लास्टिक पिशव्या, अन्य वस्तूंवर वर्गीकरण करण्याची कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प धूळखात पडलेला आहे. नगरपालिकेने संबंधित कामाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराला त्याचे कोणतेही ‘सोयर सुतक’ नाही. वर्षभराचा ठेका देऊन महिन्याकाठी लाखो रुपयांची बिले मात्र काढली जात आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप अन्‌ मेरी भी चुप’ असा प्रकार सुरु असून जनतेच्या जीवाशी खेळ चालविला आहे. दुसरीकडे घनकचरा पेटवून संपविण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. त्यासाठी लाखो रुपयांची बिले मात्र खर्ची झाली आहे. दरम्यान, नगरपालिकेने डोळ्यावर…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात गुरुवारी, ७ मार्च रोजी महिला दिनानिमित्त पूर्वसंध्येला रासेयो, रेड रिबन क्लब आणि युवती सभेतर्फे एक दिवसीय आरोग्य शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.मयूर जैन, आयटीपीसीचे ज्ञानेश्‍वर शिंपी, राजेश काकडे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या महिला प्राध्यापिका डॉ.कांचन महाजन, डॉ.ज्योती महाजन, डॉ.सुषमा तायडे, प्रा.सुलताना पटेल, प्रा. श्रद्धा चौटे यांचा महिला दिनानिमित्त विद्यार्थी स्वयंसेवकांनी पुस्तक व बुके देऊन सत्कार केला. शिबिरात डॉ.मयूर जैन यांनी ‘दंत आरोग्य तसेच स्त्री आरोग्य’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ज्ञानेश्वर शिंपी यांनी एचआयव्ही एडस्‌बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी रेड रिबन क्लबद्वारे घेण्यात आलेल्या रांगोळी व निबंध स्पर्धेचे बक्षीस…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी एखाद्या विषयाची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती कशी करता येईल, यासाठी विविध नाटिका, नाट्यछटा, गीते तसेच विविध अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी तालुक्यातील खोकरपाट येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त गुणांनाही वाव मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासही होत आहे. अशातच शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘संत तुकाराम’ नाटक सादर करुन मने जिंकली आहेत. याबद्दल नाटकातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. तसेच नाटकातील उत्कृष्ट पात्र साकारणाऱ्या चिमुकल्या कलाकार विद्यार्थ्यांना शिवशाही फाउंडेशनतर्फे बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी बडगुजर होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टीडीएफचे कार्याध्यक्ष उमेश काटे, सावित्रीबाई फुले माध्यमिक…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित श्री.एम.एम.वरिष्ठ महाविद्यालयात गणित विभागाचे ‘ॲप्लीकेशन ऑफ मॅथेमॅटीक्स इन व्हेरीअस फिल्ड’ (विविध क्षेत्रात गणिताचा वापर) ह्या विषयावर विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर व पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे.व्ही.पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. एस. टी. सूर्यवंशी होते. सुरुवातीला सरस्वती पूजन करून गणित विभागाच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध व्हिज्युअल्स आणि ॲनिमेशनचा वापर करून प्रेझेंटेशन अधिक आकर्षक बनविले. प्रेझेंटेशनमध्ये गणितातील कोडी, गणिताचा इतिहास आणि गणिताचे दैनंदिन जीवनातील उपयोग यासारख्या विषयांचा समावेश कसा करता येतो, यावर…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या भारत तांदुळच्या अमळनेर केंद्राचे नुकतेच थाटात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी दहा किलोच्या ३४२ बॅगांची विक्री झाल्या. लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे हे केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन तिरंगा चौक बालेमियाजवळ माजी नगराध्यक्षा तथा माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, बाजार समितीचे संचालक प्रकाश अमृतकार, महेंद्र बोरसे, विजय पाटील, गौरव पाटील, देविदास देसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदू वाणी, प्रदीप डेरे, सचिन पाटील, अथर्व डेरे, बंटी पाटील, मिलिंद डेरे, रवी पाटील, प्रवीण डेरे, गणेश वाणी, सुरेश पाटील, त्रिवेणी महिला मंडळासह असंख्य महिला विमल…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विद्यालयातर्फे ‘मूल्यनिष्ठ पत्रकारिता : काल, आज आणि उद्या’ विषयावर मंगळवारी मीडिया कार्यशाळा येथील शासकीय विश्रामगृहासमोरील शिवस्मृती भवनात घेण्यात आली. यावेळी ब्रह्मकुमारीज महाराष्ट्र्‌ मीडिया प्रमुख, माउंट आबूचे डॉ. सोमनाथ वडनेरे (जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला माध्यम प्रतिनिधींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी भानुदास भारंबे, प्रवीण पाटील, चंद्रशेखर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मिलिंद टोके, संतोष नवले, महेंद्र पाटील, शाम पाटील, पंकज पाटील, योगेश सैतवाल, जगदीश चौधरी, मिलींद कोरे, युसूफ शाह, फरीद शेख, राजेश चौधरी, दीपक श्रावगे, कैलास लवंगडे यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांचे कार्यशाळेला सहकार्य लाभले. सावदा येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात पाचोरा येथील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाने जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल महाराष्ट्र शासन शालेय विभागातर्फे मुंबई येथे गौरविण्यात आले. मंगळवारी, ५ मार्च रोजी, टाटा थिएटर, (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स), नरिमन पॉर्इंट मुंबई येथे झालेल्या एका सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या हस्ते गिरणाई शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ व शिक्षकांना नाशिक विभागीय तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ११ लाख रुपयाचा धनादेशासह सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, शिक्षक…

Read More