Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात कै. पी.के. शिंदे शाळेचा गौरव
    पाचोरा

    ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात कै. पी.के. शिंदे शाळेचा गौरव

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात पाचोरा येथील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाने जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल महाराष्ट्र शासन शालेय विभागातर्फे मुंबई येथे गौरविण्यात आले. मंगळवारी, ५ मार्च रोजी, टाटा थिएटर, (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स), नरिमन पॉर्इंट मुंबई येथे झालेल्या एका सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या हस्ते गिरणाई शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ व शिक्षकांना नाशिक विभागीय तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ११ लाख रुपयाचा धनादेशासह सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

    यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, शिक्षक भारतीचे आ.कपिल पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ.शेखर निकम, शिक्षक नेते संभाजी थोरात, प्रधान सचिव रणजितसिंग देवोल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे ॲड ज्युरीकेटर प्रवीण पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

    ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल मिळालेला गौरवास्पद पुरस्कार स्वीकारताना गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे, सचिव ॲड जे .डी. काटकर, उपाध्यक्ष नीरजभाई मुणोत, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. गीते, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सु.ना. पाटील, मुख्याध्यापक महेश देशमुख, विद्यालयातील शिक्षक व्ही. पी. देशमुख, श्रीमती सुषमा पाटील, श्रीमती वैशाली भालेराव उपस्थित होते.

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील शाळांची गुणवत्ता वाढ व विकास होण्याच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यात आले. उपक्रमात संपूर्ण राज्यातील १०३३१२ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कै.पी.के. शिंदे विद्यालयाने राबविलेले वित्तीय साक्षरता विषयक अभ्यासक्रम, अणुशास्त्रज्ञ डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी संकलित केलेला ग्लोबल सायन्स अभ्यासक्रम, गुणवत्ता संवर्धनाचे उपक्रम तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग नोंदविलेले उपक्रम, विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, समृद्ध ग्रंथालय व प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या उपक्रमांची नोंद अभियानात घेण्यात आली. शालेय गुणवत्तेची परंपरा कायम राखणाऱ्या शिंदे शाळेने विभागीय स्तरावर नावलौकिक मिळविल्याबद्दल गिरणाई शिक्षण संस्था व शाळेतील शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora : विवाहितेच्या तक्रारीवर पतीसह सासरच्या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

    January 17, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.