अमळनेरला भारत तांदूळ केंद्राचे उद्घाटन

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या भारत तांदुळच्या अमळनेर केंद्राचे नुकतेच थाटात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी दहा किलोच्या ३४२ बॅगांची विक्री झाल्या. लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे हे केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन तिरंगा चौक बालेमियाजवळ माजी नगराध्यक्षा तथा माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, बाजार समितीचे संचालक प्रकाश अमृतकार, महेंद्र बोरसे, विजय पाटील, गौरव पाटील, देविदास देसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदू वाणी, प्रदीप डेरे, सचिन पाटील, अथर्व डेरे, बंटी पाटील, मिलिंद डेरे, रवी पाटील, प्रवीण डेरे, गणेश वाणी, सुरेश पाटील, त्रिवेणी महिला मंडळासह असंख्य महिला विमल डेरे, निता डेरे, अलका डेरे, संगिता डेरे उपस्थित होते.

देशात महागाई वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यातही देशात तांदळाच्या किरकोळ किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र शासन देशभरात तांदूळ आणणार आहे. देशातील वाढत्या महागाईच्या काळात सरकारने नागरिकांसाठी हा निर्णय घेतला आहे. या केंद्रातून आता सर्वसामान्यांना २९ रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता येणार आहे.

राजहंस चौक पवन चौकाजवळ विक्री केंद्र

यानंतर राजहंस चौक पवन चौकाजवळ भारत तांदूळची नियमित विक्री सुरु राहणार आहे. त्यात तांदूळ २९ रुपये प्रति किलो दराने विकला जाणार आहे. हा अनुदानित तांदूळ दहा किलोंच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना कमी किंमतीत चांगला तांदूळ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here