साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे ‘मूल्यनिष्ठ पत्रकारिता : काल, आज आणि उद्या’ विषयावर मंगळवारी मीडिया कार्यशाळा येथील शासकीय विश्रामगृहासमोरील शिवस्मृती भवनात घेण्यात आली. यावेळी ब्रह्मकुमारीज महाराष्ट्र् मीडिया प्रमुख, माउंट आबूचे डॉ. सोमनाथ वडनेरे (जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला माध्यम प्रतिनिधींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी भानुदास भारंबे, प्रवीण पाटील, चंद्रशेखर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मिलिंद टोके, संतोष नवले, महेंद्र पाटील, शाम पाटील, पंकज पाटील, योगेश सैतवाल, जगदीश चौधरी, मिलींद कोरे, युसूफ शाह, फरीद शेख, राजेश चौधरी, दीपक श्रावगे, कैलास लवंगडे यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांचे कार्यशाळेला सहकार्य लाभले.
सावदा येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त विविध वर्गासाठी उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात युवा संमेलन, शेतकरी मेळावा, महिला मेळावा आणि हळदी कुंकू आदींचा समावेश आहे. प्रास्ताविक केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी वैशालीदीदी, सूत्रसंचलन ब्रह्मकुमारी दीपमाला तर आभार विकास फेगडे यांनी मानले.