पाचोरा महाविद्यालयात आकर्षक पोस्टरसह पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन

0
2

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित श्री.एम.एम.वरिष्ठ महाविद्यालयात गणित विभागाचे ‘ॲप्लीकेशन ऑफ मॅथेमॅटीक्स इन व्हेरीअस फिल्ड’ (विविध क्षेत्रात गणिताचा वापर) ह्या विषयावर विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर व पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे.व्ही.पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. एस. टी. सूर्यवंशी होते. सुरुवातीला सरस्वती पूजन करून गणित विभागाच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी विविध व्हिज्युअल्स आणि ॲनिमेशनचा वापर करून प्रेझेंटेशन अधिक आकर्षक बनविले. प्रेझेंटेशनमध्ये गणितातील कोडी, गणिताचा इतिहास आणि गणिताचे दैनंदिन जीवनातील उपयोग यासारख्या विषयांचा समावेश कसा करता येतो, यावर नऊ विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्यापैकी उत्कृष्ट पॉवर पॉईंट व पोस्टर सादरीकरण केल्याबद्दल अनुक्रमे प्रथम आकांशा जगदीश पाटील, द्वितीय सुकन्या बापु गीते, तृतीय सृष्टी संजय अहिरे या विद्यार्थिनींना प्रा. राजेंद्र चिंचोले लिखीत स्पर्धा परीक्षा सारथी पुस्तक, पेन व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह पेन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. पॉवर पॉईंट आणि पोस्टर प्रेझेंटेशनचे परीक्षक म्हणून प्रा. अतुल पाटील, डॉ. शारदा शिरोळे यांनी काम पाहिले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी प्रा.प्रदीप रुद्रसवाड, प्रा. प्राजक्ता शितोळे, प्रा. शितल पाटील, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. मेघा गायकवाड, डॉ. सीमा सैंदाणे, प्रा. प्राजक्ता देशमुख, प्रा. सरोज अग्रवाल, प्रा. संजिदा शेख, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. रोहित पवार, प्रा. संदीप द्राक्षे, विजय पाटील, विजय सोनजे, उमेश माळी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक प्रा.डॉ. वैष्णवी महाजन, सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता देशमुख, प्रा. सरोज अग्रवाल तर आभार प्रा. सुवर्णा पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here