साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील नगर पालिकेच्या २०२३-२०२४ ह्या आर्थिक वर्षातील नगर पालिकेच्या महसुलातील उत्पन्नाचा पाच टक्के निधी तीन लाख ९१ हजाराचा निधीचा धनादेश ११४ दिव्यांग लाभार्थ्यांना माजी नगराध्यक्षा साधना महाजन, पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन बागुल, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी नगरसेवक खलील अहमद यांच्या हस्ते सोमवारी, ११ मार्च रोजी प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. जामनेर नगरपरिषद हद्दीतील ३८९ दिव्यांगांनी २०२३/२४ या आर्थिक वर्षात नोंदणी केलेली होती. त्यापैकी २७५ दिव्यांगांना यापूर्वी दहा लाख दोन हजार रुपयांचा निधी वाटप केला होता. उर्वरित ११४ दिव्यांगांना निधीचा धनादेश सोमवारी प्रदान करण्यात आला. यावेळी साधना…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात नंबर एकची सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या मंगरूळ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे विश्वास अभिमन पाटील विजयी झाले. परिवर्तन पॅनल तथा भाजपाचे भगवान पाटील, जे.पी.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक बागुल, भाजपाचे तालुका सरचिटणीस राकेश पाटील, मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात चेअरमनपदी विश्वास पाटील विजयी झाले. निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी झाल्या. परिवर्तन पॅनलचे सात सदस्य आणि विरोधी पॅनलचे सहा सदस्य चार दिवस सहलीसाठी रवाना झाले होते. विश्वास पाटील यांची चेअरमनपदी निवड होऊन नये म्हणून विरोधकांनी अथक प्रयत्न केले. परंतु त्यांना परिवर्तन पॅनलच्या सात सदस्यांनी जोरदार धूळ चारत प्रामाणिकपणा दाखवत विश्वास पाटील यांना चेअरमनपदी…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील आदिवासी भागातील राहणाऱ्या नागरिकांना निर्माण होणाऱ्या मूलभूत समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, विद्युत आणि घरकुलाच्या समस्या आदी बाबतीत निर्माण होणाऱ्या अडीअडचणींवर त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाच्यावतीने जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच समस्यांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश व नाराजी शासनाबद्दल असल्याचे ॲड. संदीप पाटील यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी कामांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, गोविंदा बापू महाजन, विकास जनकराव सोनवणे, गुलाब रातु…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणेमध्ये राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा (रा.मेलाणे) हा अवैधरित्या सागाचे २७ वृक्ष व इतर प्रजातीचे ३१ वृक्ष अशा ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना इसमाविरुध्द महिला वनरक्षक यांनी वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला असल्याची माहिती चोपडा-यावल वनविभागाचे सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे यांनी दिली. चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणेमधील राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा याने अपप्रवेश करुन अवैधरित्या ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना महिला वनरक्षक यांनी त्यांस मनाई केली. तेव्हा इसमाने महिला वनरक्षक यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांचा विनयभंग करत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून पसार…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये रविवारी, १० मार्च रोजी रिपाइं आठवले पक्षाच्या कार्यकर्त्यांची तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली. रिपाइं आठवलेचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष आनंद खरात यांचे पाचोरा शहरात आगमन होताच ढोल-ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून परिसरात ढोल ताशे वाजवत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. बैठकीत रिपाइंच्या ज्येष्ठ नेत्या सत्यभामा अहिरे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते आनंद नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुकाध्यक्ष विनोद अहिरे, युवक तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब बागवान, शहराध्यक्ष शशिकांत मोरे, महिला तालुकाध्यक्षा प्रियंका सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. रिपाइंचे युवा…
साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर चोपडा तालुक्यातील धानोरासह परिसरात शेती शिवारात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सध्या उन्हाची चाहूल वाढलेली आहे. दुसरीकडे वीज पुरवठा सुरळीत नाही, अशा अनेक कारणांनी शेतकरी चांगलाच कचाट्यात सापडला आहे. दर आठवड्यात नेहमीच्या शेतातच चोरी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात येत आहे. धानोरा गावासह बिडगाव, मोहरद, देवगाव, कुंड्यापाणी, पारगाव, मितावली आदी गावांमध्ये शेतातील केबल, स्टार्टर, कटआऊट या वस्तूंचे चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात चोऱ्यांचे प्रमाण धानोरा आणि मोहरद भागात जास्त आहे. त्यात एकाच रात्रीतून १५ ते २० शेतकऱ्यांचे शेतातून केबल, स्टार्टर आणि अन्य वस्तूंच्या चोऱ्या झालेल्या आहेत. त्यात गोपाळ महाजन, लोटू महाजन, यशवंत…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे बुद्रुक गावात पायोनियर सीड्स कंपनीतर्फे महिला दिन अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गावातील महिलांसह मुलींना संरक्षण क्षेत्रातील करियर गाइडन्स, पोस्टातील गुंतवणूक योजना, कृषी क्षेत्रातील महिलांना उपलब्ध संधी, आरोग्य तपासणी शिबिर, मेडिकल फील्डमधील करिअर गाईडलाईन्स अशा वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांसाठी विविध खेळ, स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा आणि हळदी कुंकूचा कार्यक्रमाचा समावेश होता. गावातील शेतकऱ्यांना ‘मक्का पीक उच्च उत्पादन व व्यवस्थापन’ विषयावर प्रत्यक्ष मक्का मळणी करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पारोळा येथील डॉ.मेघना सोनवणे आणि डॉ.विपुल सोनवणे यांनी आरोग्य तपासणी शिबिर घेतले. तसेच हरिश्चंद्र सौंदाणे (असिस्टंट) यांनी…
साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर चोपडा तालुक्यातील धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. यावेळी गावातील ज्यांचे वय ६५ आहे. त्यांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी गावात आशा वर्कर यांच्याकडून जनजागृती करण्यात येत आहे. सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडून गावातील काही नावांची यादी आलेली आहे. त्यानुसार केंद्रात काम सुरू आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली सरोदे, आरोग्य सहायिका भारती सोनवणे, भिकुबाई बोराडे, आशा वर्कर रत्नाबाई कोळी, अमोल महाजन, प्रवीण ठाकूर हे गावातील आलेल्या वयोश्री यांचे अर्ज भरून देत आहेत. सर्व भरलेले अर्ज शासनाकडे जमा करण्यात येणार आहेत. तसेच नियमानुसार वयोश्री योजनेस पात्र असणाऱ्यांना वृद्धापकाळ सुखकर होण्यासाठी श्रवणयंत्र,…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणूक संदर्भातील सर्व अनुषंगिक कामकाजाची तयारी आतापासूनच पूर्ण करुन ठेवण्यात यावी. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील मतदान केंद्रासाठी किमान मुलभुत सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण करुन घ्याव्यात. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदार केंद्राची तपासणी पूर्ण करुन अपूर्ण कामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश जळगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय ४ रावेर लोकसभा मतदार अधिकारी तथा जळगाव अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १० – चोपडा लोकसभा मतदार संघातील सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व लोकसभा…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी मी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. माझ्या आमदारकी आणि मंत्री पदासाठी जनतेच्या प्रेमासह कार्यकर्त्यांची खंबीर साथ हीच माझी खरी श्रीमंती आहे. त्यासाठी प्रत्येक गणनिहाय बैठका घेणार आहे. त्यामुळे त्या-त्या पदाधिकाऱ्यांचे ऑडिट होणार आहे. प्रत्येक बुथ प्रमुखांनी ‘माझा बूथ-माझी जबाबदारी’ मिशन मोडवर राबवावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे शिवसेनेच्या तालुकास्तरीय मेळाव्यात बोलत होते. यावेळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, शेतकी संघाचे संचालक, घोषित झालेल्या धरणगाव तालुक्यातील आत्मा कमेटीतील अध्यक्ष व सदस्यांचा तसेच आदर्श शिक्षक भैया मराठे…