देवझिरी वनक्षेत्रात झाडाची चोरी करणाऱ्यास वन कोठडी

0
11

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणेमध्ये राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा (रा.मेलाणे) हा अवैधरित्या सागाचे २७ वृक्ष व इतर प्रजातीचे ३१ वृक्ष अशा ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना इसमाविरुध्द महिला वनरक्षक यांनी वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला असल्याची माहिती चोपडा-यावल वनविभागाचे सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे यांनी दिली.

चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणेमधील राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा याने अपप्रवेश करुन अवैधरित्या ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना महिला वनरक्षक यांनी त्यांस मनाई केली. तेव्हा इसमाने महिला वनरक्षक यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांचा विनयभंग करत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून पसार झाला होता. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिला वनरक्षक राजेंद्र डोकाऱ्या पावरा विरुध्द गुन्हा दाखल केला. आरोपीस न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चोपडा यांनी आरोपीस सोमवारी, ११ मार्चपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. इतर वनगुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाची टीम तयार केली आहे. वनगुन्ह्यातील काही आरोपी फरार आहेत. फरार आरोपींची शोध मोहीम सुरु आहे.

पुढील तपास यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जखीर एम.शेख, चोपडाचे सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी (प्रा.) गोपाल. आर. बडगुजर आणि बोरमळीचे वनपाल किरण श. गजरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here