आदिवासी भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवा

0
14

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील आदिवासी भागातील राहणाऱ्या नागरिकांना निर्माण होणाऱ्या मूलभूत समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, विद्युत आणि घरकुलाच्या समस्या आदी बाबतीत निर्माण होणाऱ्या अडीअडचणींवर त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाच्यावतीने जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच समस्यांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश व नाराजी शासनाबद्दल असल्याचे ॲड. संदीप पाटील यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी कामांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, गोविंदा बापू महाजन, विकास जनकराव सोनवणे, गुलाब रातु बारेला, सतीश बारेला, प्रमोद बारेला, विजय बारेला, उखा बारेला, दयाराम बारेला यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here